Mumbai-Goa : मुंबई-गोवा फक्त ६ तासांत, वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज नाही, वाचा रो रो कधी सुरू होणार?

Mumbai Goa RoRo Service Launching in 2025: मुंबई-गोवा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुसाट होणार आहे. सहा तासात मुंबईवरून गोव्याला पोहचणार
Mumbai-Goa M2M Ferries
Mumbai-Goa M2M Ferries
Published On

Mumbai-Goa M2M Ferries : मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत, रस्ते मार्गे हा प्रवास तब्बल १२ ते १३ तासांचा आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे हा प्रवास १५ तासांपर्यंत जातो. त्यात काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण आता झंझट संपणार आहे. मुंबई-गोवा फक्त ६ तासांत प्रवास होणार आहे. मुंबई- गोवा यादरम्यान रो रो सेवा सुरू होणार आहे, त्यामुळे मुंबईहून गोव्याला फक्त सहा तासात पोहचता येणार आहे.

एम2एम फेरीज (M2M Ferries) लवकरच मुंबई ते गोवा जोडणारी रोपॅक्स बोट सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे हा प्रवास आरामदायी आणि वेळ वाचवणारा होणार आहे. मुंबई-मांडवा रो-रो सेवा चालवणारी कंपनी एम२एम ने इटलीवरून १५ वर्ष जुनी रोपेक्स खरेदी केली आहे. रोपेक्स फेरीत ६२० प्रवासी आणि ६० कारला घेऊन जाता येऊ शकते. मुंबईतील मझगाव ते गोव्यातील मोरमुगा यादरम्यान रो रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पणजी येथे पोहचण्यासाठी परवानगी घेतली जात आहे, त्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे समजतेय.

Mumbai-Goa M2M Ferries
Mumbai Goa Expressway: मुंबई टू गोवा अवघ्या ६ तासात! एक्सप्रेस वेचं ९५% काम पूर्ण, प्रवास अतिजलद होणार

Key Features of the Mumbai-Goa RoPAX Ferry Service

मुंबई-गोवा रोपेक्स सुरू झाल्यास यामधून ६२० प्रवासी आणि ६० कार एकाच वेळी जाऊ शकतात. मुंबई गोवा प्रवासासाठी फक्त सहा ते साडे सहा तास लागण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा प्रवास करणाऱ्यांचा सहा ते सात तासांचा वेळ वाचणार आहे. मुंबईतील माझगाव डॉकवरून फेरी सेवा सुरू होणार आहे. गेव्यातील मोरमुगा डॉकपर्यंत फेरीने जाता येणार आहे.

Mumbai-Goa M2M Ferries
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

तिकिट किती असेल, Mumbai Goa Ferry Ticket Cost -

M2M Ferries आणि राज्य सरकारमध्ये तिकिटाबाबतची चर्चा सुरू आहे. २०२५ मध्येच रो रो सेवा सुरू होणार आहे. अद्याप अधिकृत तिकिट दर समोर आलेले नाहीत. इंधन, टॅक्स यावर मुंबई-गोवा तिकिटाचे दर असतील, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीला अथवा जूनमध्ये मुंबई-गोवा रो रो सेवा सुरू होईल.

गोव्याला मित्रांसोबत अथवा कुटुंबासोबत जायचं असेल तर रो रो सेवा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. प्रवासाचा वेळ तर वाचणार आहेच, त्याशिवाय आरामदायी अन् समुद्राचा आनंद घेत प्रवास करता येणार आहे. खाण्या-पिण्याची सर्व सोय फेरीमध्ये करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा रो रो सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा सुरू होणार आहे. यश मिळाल्यानंतर दररोज सेवा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com