"रविवारी- गुरुवारी ये शरीरातील भूत उतरवतो" मुंबईत भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार

Mumbai superstition case : मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त. दिंडोशी पोलिसांकडे तक्रार; कारवाईची मागणी जोरात.
Mumbai superstition case,
Mumbai superstition case,
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Andhashraddha law Maharashtra details : मालाड पूर्व परिसरात स्वतःला “देवी येणारा” सांगणाऱ्या एका भोंदूबाबामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रिदम पांचाळ असे या व्यक्तीचे नाव असून तो दर रविवारी आणि गुरुवारी आपल्या अंगात देवी येते असा दावा करत लोकांच्या शरीरातील “भूत उतरवतो” असे सांगतो. मागील दोन वर्षांपासून तो हा प्रकार करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सुरुवातीला हा सगळा प्रकार त्याच्या घरात किंवा घरासमोर मर्यादित होता. मात्र 4 एप्रिल रोजी त्याने थेट महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलावून उघडपणे अघोरी पूजा आणि जादूटोण्याचे प्रकार केल्याचे समोर आले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mumbai superstition case,
संभाजीनगर हादरले! हायकोर्टाच्या वकिलाची निर्घृण हत्या, मध्यरात्री रस्त्यात गाठले अन् सपासप वार

या पूजेसाठी वापरले जाणारे साहित्यही धक्कादायक आहे. बकऱ्याचा कलेजा, स्मशानातील राख, काळे-लाल कापड, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली, सिगारेट यांसारख्या वस्तूंचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. चार रस्त्यांच्या ठिकाणी हे साहित्य ठेवण्यासही सांगितले जाते. त्यामुळे हा प्रकार साधी पूजा नसून जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Mumbai superstition case,
Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा समजावून सांगूनही संबंधित व्यक्ती हा प्रकार थांबवत नसल्याने अखेर 65 ते 70 स्थानिकांनी एकत्र येत दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Mumbai superstition case,
घराबाहेर पडताय सावधान! महाराष्ट्र 'रेड झोन'मध्ये; काय करावे? काय करू नये?

दरम्यान, संबंधित भोंदूबाबाने सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कोणताही जादूटोणा करत नसून फक्त देवीची पूजा करून लोकांची सेवा करतो, आणि त्यातून कोणतेही पैसे घेत नाही, असा त्याचा दावा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो की, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात कसे अडकतात? आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कितपत सजग आहे?

एकीकडे सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करत असताना, दुसरीकडे अशा भोंदूगिरीचे प्रकार शहरातच खुलेआम सुरू असणे ही चिंतेची बाब आहे. आता पोलिस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com