Mumbai Water Stock: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; आतापर्यंत किती टीएमसी पाणी जमा? वाचा

Mumba Dam Water Level : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात ८ दिवसांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या पाणीपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात ८ दिवसांत पाणी पातळीत मोठी वाढ; आतापर्यंत किती टीएमसी पाणी जमा?
Mumbai Water StockSaam tv
Published On

गणेश कावडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मागील ८ दिवसांतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सात पैकी पाच धरणे काठोकाठ भरली आहे. आज मुंबईचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस कोसळल्याने पाणी पातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे. यंदा पाऊस चांगला बरसत असल्याने यावर्षी पाणीसाठ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलशयात मोठी वाढ झाली आहे. या ७ जलाशयाचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयात १३,३९,६०१ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. आजही या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी १२ ऑगस्टपर्यंत पाणीसाठ्यात ११,९१५६५ दक्षलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. तर दोन वर्षांपूर्वी १२ ऑगस्टला १३,४६,४२२ दक्षलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात ८ दिवसांत पाणी पातळीत मोठी वाढ; आतापर्यंत किती टीएमसी पाणी जमा?
Pune Water Supply Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकराना ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ५ धरण आणि २ तलाव आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये काठोकाठ भरली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापुरात असलेले तानसा धरण २६ जुलै रोजी भरलं. तर तुलसी तलाव २० जुलै रोजी ओव्हर प्लो झालं. मध्य वैतरणा धरण ४ जुलैला ओव्हरल फ्लो झालं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात एक आठवड्यानंतर आणखी तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आधीच मिटली आहे. तरी तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लवकरच १०० टक्के पाणीसाठा पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात ८ दिवसांत पाणी पातळीत मोठी वाढ; आतापर्यंत किती टीएमसी पाणी जमा?
Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात ७२ टक्के पाऊस होऊनही प्रकल्प तहानलेलीच; ३५० पाणी पुरवठा योजनांवर परिणाम

मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडले

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरणातून 2000 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. २६ टीएमसी क्षमता असलेले धरण २३ टिएमसी भरल्याने पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणाच्या अकरा गेटमधून दोन हजार क्यूसेक वेगाने पाणी मुळा नदीत प्रवाहित झाले आहे. पावसाळ्यात पहिल्यांदाच मुळा नदी प्रवाहित झाली आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पाण्याचा प्रवास जायकवाडी धरणाच्या दिशेने सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com