Mumbai Breaking: धक्कादायक! पावसामुळे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी; धावत्या लोकलमधून महिला पडली, दोन्ही पाय गमावले VIDEO

Woman Fell Down From Running Local Train At Belapur Station: मुंबईत पावसामुळे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी आहे. याच गर्दीमुळे धावत्या लोकलमधून महिला पडून तिने दोन्ही गमावल्याची घटना आज घडली.
लोकलमधून महिला पडली
Mumbai BreakingSaam Tv

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

मुंबईत काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी झालीय. या गर्दीमुळे पुन्हा एक महिला लोकलमधून पडल्याची घटना घडलीय. अनेक ठिकाणी लोकल सेवा विस्कळीत झालीय. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी झालीय.

नक्की काय घडलं?

पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येत होती. तेव्हा एक महिला पाय घसरून रूळावर (Belapur Station) पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.

घटनेचा थरार...

नवी मुंबई येथील सी.बी.डी बेलापूर स्थानकावर ही घटना घडली आहे. लोकलखाली पडलेल्या महिलेने दोन्ही पाय गमावल्याचं समोर (Woman Fell Down From Running Local Train) येतंय. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. याचा फटका मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल सेवेला बसलाय.

लोकलसेवा ठप्प

मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्यामुले लोकलसेवा ठप्प झालीय. याच कारणामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी (Mumbai News) आहे. त्यामुळे प्रवाशी मिळेल ती लोकल पकडत आहे. नागरिकांचा जीवघेणा प्रवास यावेळी पाहायला मिळतोय. सीबीडी बेलापूर स्टेशनवर धक्कादायक घटना यामुळे घडलीय. गर्दीमुळे एक महिला अचानक धावत्या ट्रेनमधून खाली पडली.

लोकलमधून महिला पडली
Mumbai Rain: मुंबईतील पावसाचा नेतेमंडळीला फटका! मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास; VIDEO

महिलेच्या अंगावरून लोकल गेली

या घटनेमध्ये महिलेच्या अंगावरून लोकल (Rain Update) गेली. तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानकात मोठा गोंधळ उडाला होता. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आज केलंय. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. मुंबईत पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय.

लोकलमधून महिला पडली
Mumbai Rain Viral Video: पाण्यातून रेल्वेचा प्रवास! चुन्नाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पुरासारखं पाणी साचलं; VIDEO पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com