Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा फटका! मुंबईसह ठाण्यात पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

Mumbai Rain Update : महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची पुन्हा हजेरी! दादर, परळ, चेंबूर आणि ठाण्यात हलक्या सरी कोसळल्या. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rain Update News
Mumbai Rain Update News AI Image
Published On: 
Summary
  • महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची पुन्हा हजेरी

  • आज सकाळपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये हलक्या सरी

  • दादर, परळ, चेंबूर आणि ठाणे परिसरात रिमझिम पाऊस

  • बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर

गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज मुंबईत पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच शहरातील अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा परिणाम देशातील विविध राज्यांमधील हवामानावर होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानाचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत पावसाने अचानक हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Rain Update News
Gold Rate Today : सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, दिवाळीपूर्वी खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

आज सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर शहरातील दादर, परळ, चेंबूर आणि ठाणे परिसरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. विशेष म्हणजे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला पावसाचा सामना करावा लागला.

दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर काही तासांत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी पुढील काही तासांत पावसाचे स्वरूप कसे राहणार, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.