Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; टँकर आणि टेंपोमधील थरारक धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

Accident News: अपघातामध्ये टेंपोच्या चालकाच्या केबिनचा पार चक्काचूर झाला आणि टेंपो चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai-Pune Expressway Accident
Mumbai-Pune Expressway AccidentSaam TV
Published On: 

सचिन कदम

Accident News: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुणा लेनवर खोपोली हद्दीत टँकर आणि आयशचर टेंपो यांच्यामध्ये टक्कर झाली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

अधिक माहिती अशी की, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुणा लेनवर खोपोली हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातामध्ये टेंपोच्या चालकाच्या केबिनचा पार चक्काचूर झाला आणि टेंपो चालकाचा जागीच मृत्यू झाला. टेंपोने टँकरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Mumbai-Pune Expressway Accident
Pune Crime News: पुण्यात गायिकेकडून तिरंग्याचा अवमान; पोलिसांत तक्रार दाखल, घटनेचा VIDEO VIRAL

माणगाव दिघी मार्गावर उभ्या ट्रेलरला रिक्षाची धडक; रिक्षातील 5 प्रवासी जखमी

माणगाव दिघी महामार्गावर देखील आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रेलरला रिक्षाने मागून धडक दिल्याने अपघात झालाय. अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये तीन लहान मुलं, एक महिला आणि रिक्षा चालकाचा समावश असून दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षाचा पार चक्काचूर झाला आहे.

Mumbai-Pune Expressway Accident
Satara Accident News : वाईत बसच्या चाकाखाली सापडून सातवीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com