Satara Accident News : वाईत बसच्या चाकाखाली सापडून सातवीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Wai Bus Stand Accident : वाई बसस्थानकावर काही काळ शांतता पसरली हाेती.
satara breaking news, wai bus stand,
satara breaking news, wai bus stand, saam tv

Satara Breaking News : शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बसस्थानाकावर आलेली एक शालेय विद्यार्थ्यींनी बसच्या चाकाखाली सापडली. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वाई बसस्थानाक परिसरात काही क्षण शांतता पसरली आहे. (Maharashtra News)

satara breaking news, wai bus stand,
Prithviraj Chavan : मलिकांना जामीन... हे बरेच काही सूचक आहे, पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांवर राेख? (पाहा व्हिडिओ)

आज दुपारच्या सुमारास वाई बसस्थानकावर (msrtc) नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी हाेती. यामध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थींनी यांची लक्षणीय संख्या हाेती. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे परगावचे प्रवासी देखील महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी वाईतील बसस्थानकावर दिसून येत हाेते.

satara breaking news, wai bus stand,
VIP Darshan in Trimbakeshwar : जिल्हाधिका-यांच्या विनंतीनंतरही त्र्यंबकेश्वर देवस्थान निर्णयावर ठाम, आजपासून व्हीआयपी दर्शन सुविधा बंद

या बसस्थनाकावर आज दुपारच्या सुमारास एक दुर्देवी घटना घडली. इयत्ता सातवीत शिकणा-याचा मुलीचा एसटीच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. या घटनेनंतर बसस्थानकावरील घटनास्थळी ताेबा गर्दी झाली.

या घटनेची माहिती कळताच वाई पाेलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यासाठी पाेलिसांनी प्रयत्न सुरु केल्याचे समजते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com