Prithviraj Chavan : मलिकांना जामीन... हे बरेच काही सूचक आहे, पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांवर राेख? (पाहा व्हिडिओ)

SC grants bail to NCP leader Nawab Malik : यामध्ये राजकीय काही नाही असेही भुजबळांनी स्पष्ट केले.
NCP Nawab Malik
NCP Nawab Malik Saam TV

Nawab Malik News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषत: काॅंग्रेसच्या नेत्यांनी मलिकांना जामीन मंजूर हाेणे म्हणजे पुन्हा एक राजकीय खेळी आहे की काय अशी शंका व्यक्त करीत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काॅंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आराेग्य विषयक अडचणींमुळे मलिकांना जामीन मंजूर झाल्याचे नमूद केले. (Maharashtra News)

NCP Nawab Malik
VIP Darshan in Trimbakeshwar : जिल्हाधिका-यांच्या विनंतीनंतरही त्र्यंबकेश्वर देवस्थान निर्णयावर ठाम, आजपासून व्हीआयपी दर्शन सुविधा बंद

सर्वाेच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना नुकताच जामीन मूंजर केला आहे. दरम्यान यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी साम टीव्हीशी बाेलताना मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

वाब मालिकांना राजकीय दबाव आणून भूमिका घ्यायला भाग पाडले असावे असा राजकीय संशय असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. सीबीआय यंत्रणांनी आता जामीनला विरोध का केला नाही असाही प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

NCP Nawab Malik
Pandharpur Vitthal Mandir News : अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात 4 लाख भाविक दाखल

काॅंग्रेसच्या आमदार यशाेमती ठाकूर यांनी देखील नवाब मलिक यांना आधीच जामीन दयायला पाहिजे होता असे म्हटलं हाेते. त्या म्हणाल्या दबावतंत्र, सेंट्रल एजन्सीचा गैरवापर अशा अनेक गाेष्टी हाेत आहेत. त्या बरोबर नाहीत.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) छगन भूजबळ यांनी मलिकांना आराेग्य विषयक अडचणी असल्याने जामीन मंजूर झाला आहे. दाेन महिन्यांसाठी त्यांना आराेग्य सुविधेसाठी ही प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यामध्ये राजकीय काही नाही असेही भुजबळांनी स्पष्ट केले.


Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com