Mumbai : ऐन दिवाळीत उडत्या आकाश कंदीलावर ३० दिवसांची बंदी, ड्रोन उडवण्यासही मनाई

Drone & Flying Lantern Ban : दिवाळीच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळसणात मुंबई शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी राहणार आहे. तसेच कंदीलांवरही बंदी आहे.
Drone & Flying Lantern Ban In Mumbai
Drone & Flying Lantern Ban In Mumbaix
Published On
Summary
  • दिवाळी सणासाठी मुंबई पोलिसांची तयारी

  • ड्रोन, आकाशकंदीलांवर राहणार बंदी

  • नियम न पाळल्यास होणार कारवाई

Drone & Flying Lantern Ban In Mumbai : दिवाळीचा सण अवघ्या दोन आठवड्यांवर आला आहे. या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तालयाने सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शहरात ड्रोन आणि आकाश कंदील उडवण्यात बंदी लागू केली आहे. उत्सवादरम्यान ड्रोन, आकाश कंदील यांच्या वापराशी संबंधित संभाव्य धोके टाळण्यासाठी सक्रीय उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. याशिवाय पोलीस आयुक्तालयाने शहरात उडत्या कंदीलांची विक्री, साठवणूक आणि वापर यावरही ३० दिवसांची बंदी घातली आहे.

हवेतील उपकरणांमुळे अपघात होऊ शकतात. आग लागू शकते. या उपकरणांचा वापर करुन काही समाजकंटक व्हीव्हीआयपी लोकांना धोका पोहोचवू शकतात. सार्वजनिक व्यवस्था बिघडू शकते असे म्हणत मुंबई पोलीस आयुक्तालयाने ड्रोन आणि हवाई कंदील यांच्यावर बंदी लादण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Drone & Flying Lantern Ban In Mumbai
Maharashtra Politics : कोकणात मोठा उलटफेर! ठाकरे गटाला फटका, बड्या नेत्याचे कट्टर समर्थक फोडले

ही दोन दोन टप्प्यांमध्ये लागू केली जाईल. ७ ऑक्टोबरपासून ते ५ नोव्हेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर पूर्ण बंदी राहील. त्यानंतर १२ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या ३० दिवसांत हवेत उडणारे कंदील वापरणे, त्यांचा साठा करणे किंवा त्यांची विक्री करणे यावर बंदी आहे.

Drone & Flying Lantern Ban In Mumbai
मोबाइल फोन ते मतदार ओळखपत्र...निवडणूक प्रक्रियेत तब्बल १७ बदल, निवडणूक आयोगानं यादीच जाहीर केली

मुंबई पोलिसांनी इशारा दिला आहे की या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांना धोकादायक पद्धतींपेक्षा सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.

Drone & Flying Lantern Ban In Mumbai
Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com