Mumbai News: पोट दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली, रिपोर्ट्सही नॉर्मल आले; मात्र ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

Worm Found In Bile Duct: एक महिला तिच्या पोटात दुखत असल्यामुळे हॉस्पीटलमध्ये गेली. तपासणीनंतर तिच्या पोटात १७ सेमी आकाराचा जिवंत अळी सापडली, ही घटना मुंबईमध्ये घडली आहे.
Worm Found In Bile Duct
Worm Found In Bile DuctSaam Tv

Latest Mumbai News

क्रॉफर्ड मार्केटमधील 45 वर्षीय महिला पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा त्या महिलेच्या पित्त नलिकेत 17 सेमी आकाराचा जिवंत अळी सापडली (Mumbai News) आहे. या घटनेमुळे डॉक्टरांसहित सगळ्यांना धक्का बसला आहे. या अळीचं नाव अस्कारिस लुम्ब्रिकॉईड असून ती साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळते. प्रौढांमध्ये अतिशय दुर्मिळपणे ही अळी आढळल्याच्या घटना घडतात. (Latest Marathi News)

मागील गुरुवारी या महिलेवर पित्ताशयातील खडा काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली होती. डॉ.गजानन रोडगे यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर ही महिला पोटदुखीच्या कारणामुळे (Stomach Pain) हॉस्पीटलमध्ये पोहोचली. त्यामुळे तिच्या पोटात अन्नाचे कण किंवा पाण्याचे काही कण असल्याचा डॉक्टरांना अंदाज होता. त्यामुळे वेदना होत असाव्यात अशी शक्यता त्यांनी वर्तविली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रुग्णावर उपचार करणारे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. गजानन रॉडगे यांनी सांगितलं की, तपासणी केल्यानंतर तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत. पित्तविषयक प्रणालीमध्ये बारीक कण असल्यासारखं काहीतरी दिसत (Worm Found In Bile Duct) होतं. त्यामुळे वेदना होत असाव्यात असा अंदाज त्यांनी बांधला. त्यानंतर त्यांनी वेदना कमी होण्यासाठी पित्त नलिकाचा स्टेंट काढण्याची योजना आखली.

ऑपरेशन दरम्यान पित्त नलिकेत पांढरी नळीच्या आकाराची रचना दिसून आली, त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय पथकाला आश्चर्य वाटले. ती नळी सारखी हालचाल करत होती, मागे पुढे सरकत ( Worm Found In Bile Duct) होता. त्यामुळे त्यांनी या कृमीला यशस्वीरित्या पित्त नलिकातून बाहेर काढले आणि वेगळे केले गेले.

Worm Found In Bile Duct
Mumbai Hospital: रुग्णालयाचा निष्काळजीपणा; कुटुंबीयांकडे पाठवला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह, स्मशानभूमीत सत्य आलं समोर

डॉक्टरांनी सांगितलं की, ही अळी सुमारे 17 सेमी किंवा सुमारे 6.7 इंच लांबीचा आहे. Ascaris Lumbricoides ही एक परजीवी अळी आहे. दरवर्षी एक अब्ज लोकं या अळीमुळे (Latest Mumbai News) आजारी पडतात. पित्त नलिकेच्या आत ही अळी जिवंत सापडणे ही एक असामान्य गोष्ट आहे. डॉक्टरांनी या महिलेच्या कुटुंबाला जंतनाशक औषधे लिहून दिली आहेत. या महिलेवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

Worm Found In Bile Duct
Fake doctor in Mumbai : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर; रुग्णांना द्यायचा रुग्णांना इंजेक्शन आणि सलाइन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com