India Corona Update: कोरोनाचा कहर संपेना! मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३०५ नवे रूग्ण

Corona Latest News: देशभरात कोरोनाचं कहर संपत नाहीये. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३०५ नवे रूग्ण आढळले आहेत.
Corona Update
Corona UpdateSaam Tv

New Corona Patient In India

थंडीमुळे पुन्हा कोरोनाचं कहर वाढताना दिसतोय. तसंच कोरोनाचा नवीन प्रकारचा संसर्गही वाढतच आहे. ५ डिसेंबपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या घटली होती. त्यानंतर (Corona News) पुन्हा आता ही संख्या वाढताना दिसतेय. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतेय. (latest corona update)

भारतात एका दिवसात कोरोनाच्या रूग्णांमध्ये ३०५ नवीन रूग्णांची भर पडली आहे. संसर्गाच्या सक्रिय रूग्णांची संख्या २,४३९ वर आहे, असं आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (corona update) सांगितलं. मंत्रालयाने सकाळी ८ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील प्रत्येकी एक - तीन मृत्यूची नोंद झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


कोरोनाच्या तीन लाटा

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार JN.१ उप-प्रकारामुळे नवीन रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत नाहीये. हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूदरातही वाढ होत नाही. देशात यापूर्वी कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. २०२० च्या सुरुवातीला कोरोना महामारीची सुरूवात झाली होती. देशभरात आतापर्यंत 4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला (Corona Latest News) आहे. त्यानंतर चार वर्षांत ५.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जेएन-१ उपप्रकार नक्की काय आहे

जेएन-१ हा कोरोना विषाणूच्या उप प्रकाराचाच एक भाग आहे. २०२३च्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जेएन-१ या उपप्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता. सर्दी होणं, नाक गळणे, घसा दुखणे किंवा सारखे घशात खवखवणे, सारखा ताप येणं किंवा ताप अंगातच मुरणे, डोकेदुखी आणि पोटदुखी, तसंच जुलाब होणं ही जेएन-१ ची लक्षणं आहेत

Corona Update
Maharashtra Corona Update: आज राज्यभरात आढळले नवीन ८३ रुग्ण; पुण्यात वाढला कोरोना रुग्णांचा आकडा

'अशी' घ्या काळजी

जेएन-१ या विषाणूचे लक्षणं जाणवल्यानंतर जर घरीच काळजी (new corona patient) घेतली, तर रूग्णालयात जाण्याची गरज नाही. भरपूर पाणी प्यायचं, सर्दी झाल्यानंतर मास्कचा वापर करायचा. ज्या व्यक्तींनी अजून लस घेतलेली नाही, अशा लोकांनी लगेच लस घ्यावी. वयस्कर लोकांनी गर्दीत जायचं टाळावं, आणि जर ताप जाणवत असेल तर अशा लोकांनी त्वरित उपचार घ्यावे.

Corona Update
Corona News | राज्यात जेएन.1 रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ, चिंता वाढली!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com