
मयूर राणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Mumbai Accident News : मुंबईच्या साकीनाकामध्ये दु:खद घटना घडली आहे. साकीनाका येथील काजू पाडा विभागात इको कारने एका महिलेला धडक मारली. या अपघात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी इको कारच्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या अकरा वर्षाच्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. तेव्हा इको कारने तिला जोरदार धडक मारली. धडक लागल्याने महिलेचा मृत झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताचा तपास करायला सुरुवात केली.
मृत महिलेचे नाव मंजूदेवी मोर्या असे आहे. ती सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेजवळ गेली होती. त्याचवेळी शाळेच्या आवारात असलेली इको कार भरधाव वेगात बाहेर निघाली. तेव्हा महिलेला जोरात धडक बसली. समोरच्या दुकानाची भिंत आणि गाडीच्या मध्ये ही महिला चेंगरुन गेली. चेंगरल्याने महिलेच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या.
जखमी अवस्थेमध्ये तिला कारचालक महादेव हांडेने भाभा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी कारचालक महादेव हांडेला अटक केली. त्यांनी कारचालकाला साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.