Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Mumbai News : आरे कॉलनीत चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट भरत अहिरे यांचा पत्नी, प्रियकर आणि त्याच्या भावाने हत्या केली. १२ वर्षीय मुलीच्या साक्षीने हा थरारक कट उघडकीस आला असून पोलिसांनी पत्नी व एका आरोपीला अटक केली आहे.
Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • आरे कॉलनीत पत्नी, प्रियकर आणि त्याच्या भावाने मेकअप आर्टिस्ट पतीचा खून केला.

  • १२ वर्षीय मुलीच्या धाडसी साक्षीने हत्या प्रकरण उघडकीस आले.

  • मृताला मारहाणीने गंभीर दुखापत होऊन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • पोलिसांनी पत्नी व एका आरोपीला अटक केली असून प्रियकर फरार आहे.

संजय गडदे (मुंबई )

आरे कॉलनीत पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी व थरारक घटना उघडकीस आली आहे. चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या भरत अहिरे (४०) याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर व त्याच्या भावाच्या मदतीने हत्या केली. मृत व्यक्तीच्या बारा वर्षीय मुलीच्या साक्षीने मृत्यूचा थरारक कट उघड करण्यास आरे पोलिसांना यश मिळाले आहे. आरे पोलिसांनी मृताची पत्नी राजश्री व आरोपी रंगा यांना अटक केली असून, प्रियकर चंद्रशेखर फरार आहे.

कसा रचला हत्येचा कट ?

मिळलेल्या माहितीनुसार, १२ जुलैच्या रात्री राजश्री हिने फोन करून प्रियकर चंद्रशेखरला बोलावले. त्यानंतर पती भरतला छोटा काश्मीर गार्डन परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ नेण्यात आले. तिथे चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांनी भरतवर लाथा-बुक्क्यांनी मारले. यात भरतच्या पोटातील रक्तवाहिन्या फुटल्या, पसळ्या मोडल्या आणि लिव्हरचे गंभीर नुकसान झाले. त्याच्यावर तब्बल पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र उपचारादरम्यान ५ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश
Goregaon Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग! अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक | VIDEO

१२ वर्षीय मुलीने केला आईच्या प्लॅनचा भांडाफोड

भरतची मुलगी श्रेया हिने पोलिसांना सांगितले की, मारहाणीच्या वेळी तिची आई जवळ उभी होती आणि सतत "आणखी मारा, संपवून टाका!" असे म्हणत होती. घटनेनंतर आईने मुलीला धमकावून सांगितले की, "कोणाला सांगितलंस तर तुला आणि तुझ्या भावंडांना मारून टाकीन."

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश
Goregaon Film City: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, गोरेगाव फिल्म सिटीतील १५ दिवसांतील तिसरी घटना

तीन दिवस गुप्त ठेवला प्रकार

भरतला घटनेनंतर तब्बल तीन दिवस घरातच उपचाराशिवाय ठेवण्यात आले. त्याची तब्येत बिघडल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. १६ जुलै रोजी भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाही पत्नी त्याला "बाईकवरून पडलो असं सांग, नाहीतर मुलांना मारून टाकीन" अशी धमकी देत होती. भरतच्या आईच्या मते, राजश्रीचा चंद्रशेखरसोबतचा संबंध जवळपास वर्षभर सुरू होता. मुलाला समजावण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो निष्फळ ठरला. मुलाच्या मृत्यूमागे हा पूर्वनियोजित कटच असल्याचा त्यांचा आरोप आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, "घटनेच्या रात्री राजश्रीने प्रियकराला पतीच्या खुनाची सुपारी दिली. तपास सुरू असून फरार चंद्रशेखरचा शोध घेतला जात आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com