Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set
Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial SetSaam TV

Goregaon Film City: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, गोरेगाव फिल्म सिटीतील १५ दिवसांतील तिसरी घटना

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set: अचानक बिबट्याला पाहून या सेटवर एकच गोंधळ उडाला.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set:

गोरेगावच्या फिल्मसिटी (Goregaon Film City) परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर पाहायला मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये आता पुन्हा फिल्मसिटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या (Leopard) घुसला. अचानक बिबट्याला पाहून या सेटवर एकच गोंधळ उडाला. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set
Digha Railway Station: दिघा रेल्वे स्टेशन लवकरच सुरु होणार, बांधकाम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटीमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. गेल्या १५ दिवसांतील बिबट्या दिसण्याची ही तिसरी घटना आहे. यामुळे फिल्म सिटीमध्ये येणाऱ्या कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फिल्म सिटी परिसरात मराठी मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेचाही सेट आहे. या मालिकेच्या सेटवर शुटिंग सुरु असताना अचानक बिबट्या घुसला.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set
Nagpur Crime News: नागपुरात चाललंय काय? 24 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी 4 जणांच्या हत्या, शहरामध्ये खळबळ

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या सेटवर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शुटिंग सुरु असताना अचानक बिबट्या आला. त्यामुळे सेटवर शुटिंगसाठी उपस्थित असलेल्या कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने बिबट्याने कोणावर हल्ला केला. सेटवर बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वीच फिल्मसिटीमधील एका मराठी मालिकेच्या सेटवर अचानक बिबट्या घुसला होता. तेव्हा देखील मालिकेचे शुटिंग सुरु होते. या बिबट्याने मालिकेच्या सेटवर घुसून त्याठिकाणी बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला होता. अचानक सेटवर बिबट्या घुसला. सेटवर बिबट्याने एन्ट्री केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी सेटवर 200 हून अधिक जण उपस्थित होते.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Set
Mumbai-Goa Highway: निवळी घाटात दरड कोसळली, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा

गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग सुरु असते. या सेटच्या ठिकाणी अनेक लोकं काम करतात. बऱ्याचदा रात्रीचे देखील शुटिंग सुरु असते. अशामध्ये या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. या परिसरात सतत बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या परिसरात कायम दहशतीचे वातावरण आहे.

कधी बिबट्या कुठून येईल आणि हल्ला करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे सर्वजण जीव मुठीमध्ये धरुन याठिकाणावरुन प्रवास करतात. या परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्यामुळे याठिकाणच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com