मुंबई : मुंबईत (Mumbai News) रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना गर्दीत वाट शोधावी लागते. अत्यंत वर्दळीच्या प्लॅटफॉर्मवर तर स्थिती आणखी बिकट असते. मात्र मुंबईत कुर्लासारख्या वर्दळीच्या प्लॅटफॉर्मवर थेट रिक्षा धावताना दिसली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याचं पाहून तिथे उपस्थित लोकही चक्रावले. संबंधित रिक्षाचालकावर (Rikshaw Driver) गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
एका यूजरने व्हिडीओ शेअर करत आरपीएफला टॅग करून याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्या यूजरने ट्वीटमध्ये लिहिले की, कुर्ला स्टेशनवर ऑटो माफियांची हिंमत, कृपया हे तपासा आणि कारवाई करा. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफची खिल्ली उडवली आणि अधिकाऱ्यांवरही टीका केली. (Latest Marathi News)
अनेक यूजर्सनी यानंतर ट्वीट करत याबाबत ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आरपीएफने संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला न्यायालयात हजर केले गेले आणि लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर ऑटो रिक्षा चालवल्याबद्दल रेल्वे कायद्यानुसार शिक्षा झाली.
आरपीएफने ऑटो जप्त केली असून ऑटो चालकावरही कारवाई केली आहे. कुर्ला आरपीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक ऑटोरिक्षा अॅक्सिलेटरच्या मागील बाजूने कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये चुकून घुसल्याची घटना घडली. नंतर त्यानंतर रिक्षा रेल्वे पोलीस दलाने जप्त केले आणि रिक्षा चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.