धक्कादायक! लॉजवर दोघांमध्ये झालं भांडण, प्रेयसीच्या ओढणीने गळफास लावून प्रियकराची आत्महत्या

पुण्यात प्रेमप्रकरणामुळं एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
couple
couple Saam Tv
Published On

सचिन जाधव

पुणे : येथे प्रेमप्रकरणामुळं एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एक प्रेमीयुगुलामध्ये सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील एका लॉजवर गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये लग्नावरून वादविवाद झाले. तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे, मी जगून तरी काय करू, असं म्हणत एका तरूणाने त्याच्या प्रेयसीचा दुपट्टा घेवून गळफास लावत आत्महत्या केली. साकिब (२५) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. तो आळंदी रोड येथील दिघी येथे राहत होता. (Boyfriend ends life because of love marriage issue with girlfriend)

couple
T20 World Cup : नेदरलॅंडचं वर्ल्डकपमध्ये टेक ऑफ, अटीतटीच्या सामन्यात यूएईचा केला पराभव

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरूणाचं त्याच्या प्रेयसीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आज सकाळी हे प्रेमीयुगुल गोळेवाडी येथील एका लॉजवर आले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये लग्न करण्यावरून खटके उडाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, तरुणाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

couple
Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नये, निवडणूक बिनविरोध करावी, शरद पवारांचं आवाहन

तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे, मी जगून तरी काय करू, असं म्हणत एका तरूणाने त्याच्या प्रेयसीचा दुपट्टा घेवून गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तपास सुरू केला असून तरूणाचा मृतदेह ससून रूग्णालयात पाठवला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com