गिरीश कांबळे, मुंबई|ता. २९ जानेवारी २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुंबई जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांची आज (सोमवार, २९ जानेवारी) ईडीकडून चौकशी होत आहे. या चौकशीसाठी रविंद्र वायकर हे ईडी (सक्तवसुली संचनालय) कार्यालयात दाखल झाले आहेत. ५०० कोटींच्यी कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची ही चौकशी होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचशे कोटी रुपयांच्या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) ईडीच्या रडारवर आहेत. आज ईडीने रविंद्र वायकर यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले होते. याआधीच्या दोन समन्सला वायकर हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या चौकशीला रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात हजर राहणार का? याबाबत शंका होती.
मात्र सकाळी ११ वाजता ते ईडी (ED) कार्यालयात गेले. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता तिसऱ्या समन्सला आमदार वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहेत आरोप?
रविंद्र वायकर यांच्यावर तब्बल ५०० कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावर आहे. या जागी वायकरांनी बांधलेल्या हॉटेलची किंमत एकूण ५०० कोटी रुपये असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.