Viral Video: मुंबई विमानतळावर नेमकं चाललं काय? कॅब चालकाला सुरक्षा रक्षकाकडून शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Crime news : एका वाहन चालकाला सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता तशीच दुसरी घटना देखील उघडकीस आली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam tv

संजय गडदे

Mumbai News: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाहन तळात एका वाहन चालकाला सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता तशीच दुसरी घटना देखील उघडकीस आली आहे.

विमानतळावरील सुरक्षारक्षकांची दादागिरी वाढली आहे का असाच प्रश्न आता यानिमित्ताने उभा राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कॅब चालकाला सुरक्षारक्षकाने शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकाने शिवीगाळ करत कॅब चालकाला मारहाण केली होती. या सुरक्षारक्षकाने केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Mumbai News
Mumbai Local Train Viral Video: क्षुल्लक कारणावरुन प्रवाशांमध्ये वाद; दिवा स्टेशनवर दोघांना प्लटफॉर्मवर लोळवून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

अनेकांकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती. याच प्रकरणी सहारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश मोहिते असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कॅब चालक हा विमानतळावर पॅसेंजरला सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी कॅब चालकाला पुन्हा बाहेर पडताना त्या ठिकाणावरून एक दुसरे भाडे घेऊन बाहेर निघाला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक गणेश मोहिते यांनी कॅब चालकाला ऑफलाईन भाडे घेऊन जाण्यास रोखले. त्यानंतर

शिवीगाळ करत जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील केली. या मारहाणीचा व शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला. त्यानंतर सहारा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक गणेश मोहिते विरोधात भादवि कलम ३२३,५०४,५०६(२) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी गणेश मोहिते यास अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com