Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा

Maharashtra Politics: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे रोहित पवार यांना महागात पडलं. त्यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा
Sharad PawarSaam Tv
Published On

Summary -

  • पत्रकार परिषदेत ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड बनवून दाखवणे राष्ट्रवादीच्या आमदाराला भोवलं

  • रोहित पवारांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला

  • त्यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधारकार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधारकार्ड बनवणे त्यांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी जाहीररित्या बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधार कार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस आधारकार्ड बनवणे हा गुन्हा असून हे देशविरोधी कृत्य आहे असे बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपा पदाधिकारी धनंजय वागस्कर यांनी ही तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांची रोहित पवार यांच्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी ही माहिती दिली.

Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा
Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

नवनाथ बन यांनी सांगितले की, 'संबंधित संरचनेमध्ये भारतात बोगस आधार कार्ड बनवता येत नाही. रोहित पवार यांना याप्रकरणी आता पळ काढता येणार नसून रोहित पवार यांचा ‘बोलविता धनी’ कोण यांचा सखोल तपास होणार आहे. https://www.rechrgeservi. shop/admin/index.php या वेबसाईटवरून बनवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड हे खरे असल्याचे भासवत त्याचा वापर बोगस मतदार नोंदणीसाठी होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. देशातील निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेविरोधात आणि भाजपा विरोधात जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित यांनी केले असल्याची टीकाही नवनाथ बन यांनी केली.

Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा
Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना भाजपचा दे धक्का; दोन्ही पक्षांना पाडलं भलं मोठं खिंडार, ६००जणांचा पक्षप्रवेश

रोहित पवार यांनी सार्वजनिक शांतता बाधीत करण्याचे काम केले असल्याचे धनंजय वागस्कर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य केल्याबद्दल वेबसाईट तयार करणारा, वापर करणारा, वेबसाईटचा मालक आणि इतर संबंधीतांविरोधात मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात कलम 336(2), 336(3), 336(4), 337, 353(1) (बी), 353(1) (सी), 353(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 66 (क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा
Maharashtra Politics: नेत्यांची कापाकापी फोडा-फोडीची भाषा; कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com