Maharashtra Politics: नेत्यांची कापाकापी फोडा-फोडीची भाषा; कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

Maharashtra Politics: एकेकाळी प्रतिष्ठेसाठी आणि सभ्यतेसाठी प्रशंसित असलेली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आता ऱ्हास पावू लागलीय. नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय नीतिमत्तेवर आणि वारशावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra’s political dignity under threat as leaders’ harsh statements spark public outrage.saam tv
Published On
Summary
  • राजकीय संस्कृती गेल्या काही दिवसांत ढासळलीय.

  • नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होऊ लागलीय.

  • राजकीय नेत्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीचा विसर पडलाय

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होतोय. राजकीय पुढाऱ्यांची वक्तव्य ऐकून तर, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' अशी भावना मनात आल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसात कोणत्या नेत्यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना कापण्याची भाषा केलीय? नेमकं काय चाललंय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रानं आपली पासष्टी पुर्ण केलीये. देशभरात सभ्य सुसंस्कृत राजकारणाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय अब्रु हे गेल्या काही दिवसांपासून पार धुळीला मिळालीये. होय यशवंतराव चव्हाणांनी मुहुर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्र सध्या बिहारच्या मार्गावर चाललाय. आम्ही हे का म्हणतोय त्यासाठी ऐका आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची ही वक्तव्य.

ऐकलंत. आता सांगा. कोणत्या तोंडानं आपण आपल्या महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे गोडवे गायचे. आमदार बच्चू कडू हे २० वर्ष आमदार राहिल आहेत. ते राज्याचे माजी मंत्रीही आहेत. प्रकाश आंबेडकर हे राज्यसभा आणि लोकसभेत खासदार राहिलेले आहेत. तर रविकांत तुपकर हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष राहिले होते आणि त्यांची जर भाषा अशा कापाकापी आणि हाणामारीची असेल तर कार्यकर्त्यांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना भाजपचा दे धक्का; दोन्ही पक्षांना पाडलं भलं मोठं खिंडार, ६००जणांचा पक्षप्रवेश

राजकारणात विरोधक कधी सत्ताधारी होतात तर सत्ताधारी कधी विरोधक. त्यामुळे विरोधात असलेल्यांनी टीक करताना संयम बाळगण्याची गरज आहे. मात्र य़ात सत्ताधारीही मागे नसल्याची काही आमदारांनी दाखवून दिलंय. यामुळे सत्तेत असो किंवा नसो राजकीय पुढारी आपली मर्यादा विसरत चालले इतकं मात्र खरं. गांधींच्या देशात नेत्यांची ही हिंसक शिवराळ भाषा वापरल्यामुळे नेमका कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com