जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. ही संतापजनक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हशवी संकेत मेहता असे मृत बाळाचे, तर मनाली मेहता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मूळ गुजरातमधील सुरतची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतील (Mumbai Crime News) मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती.
मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, या तणावातून गुरुवारी पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकलं. (Latest Marathi News)
या घटनेत हशवीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईनेच आपल्या बाळाला १४ व्या मजल्यावरून फेकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. यानंतर पोलिसांनी मृत बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना सांताक्रुजमध्ये घडली. न्यू लोटस बिल्डिंग साईट राजेश खन्ना गार्डन या इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शहाबुद्दीन नजरुल गाजी याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातून आरोपीने हे कृत्य केलं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.