Shocking: सफाई कर्मचाऱ्यानं पेशंटला तपासलं, ECG काढला; मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमधला प्रकार, VIDEO

Hospital Cleaners Checking Patients In Mumbai: चेंबूरच्या मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचारी रुगांचे ईसीजी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai News: धक्कादायक! सफाई कर्मचारी काढतो रुग्णांचे ECG, मुंबईतल्या पालिका रुग्णालयातील घटना; VIDEO व्हायरल
Hospital Cleaners Checking Patients In MumbaiSaam Tv
Published On

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे. मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील ही घटना आहे. या गंभीर घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचारी रुगांचे ईसीजी करत आहेत. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला आहे. शताब्दी रुग्णालयात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात पण या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

Mumbai News: धक्कादायक! सफाई कर्मचारी काढतो रुग्णांचे ECG, मुंबईतल्या पालिका रुग्णालयातील घटना; VIDEO व्हायरल
Mumbai: घरातल्या वादाला कंटाळून सोडलं घर, तीन महिने इंजिनियर मुंबईच्या फुटपाथवर राहिला, सुरक्षारक्षकांनी कसा जीव वाचवला?

गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत आणि त्यावरच उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे. रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याबाबत जाब विचारला. पण डॉक्टर आणि कर्मचारी यांची कमतरता आहे आणि या सफाई कर्मचाऱ्यांना याच प्रशिक्षण दिलं आहे आणि ते गेले काही दिवस हे काम करत असल्याचे सांगितले.

Mumbai News: धक्कादायक! सफाई कर्मचारी काढतो रुग्णांचे ECG, मुंबईतल्या पालिका रुग्णालयातील घटना; VIDEO व्हायरल
Mumbai Travel : मुंबईकरांनो कामावरून थकून आलात, आवडत्या व्यक्तीसोबत 'या' ठिकाणाला भेट द्याच

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यातील दोषीवर कारवाही करण्याची मागणी रुकसाना सिद्दिकी यांनी केली आहे. तर यावर पोलिसात तक्रार दाखल करून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासन याची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचे ठरेल.

Mumbai News: धक्कादायक! सफाई कर्मचारी काढतो रुग्णांचे ECG, मुंबईतल्या पालिका रुग्णालयातील घटना; VIDEO व्हायरल
Mumbai : मुंबईजवळील समुद्रात पुन्हा बोटीचा अपघात; जहाजाच्या धडकेत बोट बुडाली, थरारक व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com