Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?

Mumbai New Advertising Policy: मुंबईमध्ये होर्डिंगवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे पदपथ, इमारतींच्या गच्चीवर जाहिरात फलकांना मनाई करण्यात आली आहे. याबाबत पालिकेकडून नवीन जाहीर धोरण लागू करण्यात आले आहे.
Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?
Mumbai New Advertising PolicySaam Tv
Published On

Summary -

  • मुंबई पालिकेने पदपथ आणि गच्चींवर होर्डिंग लावण्यास मनाई केली

  • डिजिटल फलकांसाठी प्रकाशमानता आणि आकार यावर कडक नियम लागू केले

  • मुंबई महानगर पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर

  • घाटकोपर दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने २१ शिफारसींवर आधारित धोरण तयार करण्यात आले

मुंबईतील पदपथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेकडून जाहिरात फलकांबाबत नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेकडून नव्या धोरणाचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार आता पदपथ आणि इमारतींच्या गच्चींवर जाहिरात फलकांस मनाई करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून 'जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५' जाहीर करण्यात आली आहेत. या नव्या धोरणानुसार, एकेरी आणि पाठपोट (बॅक टू बॅक) फलकांसोबत 'व्ही' आणि 'एल' आकारास परवानगी देण्यात आली आहे. त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी स्वरुपाच्या जाहिरात फलकांनाही परवानगी असणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे.

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?
Mumbai Pune Expressway : वाहतूककोंडीची कटकट संपणार, मुंबई-पुणे प्रवास ३० मिनिटांनी कमी होणार

महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. ४० × ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या फलकांना परवानगी मिळणार नाही. या धोरणामध्ये पदपथ आणि इमारतींच्या गच्चींवर जाहिरात लावण्यास परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच, डिजिटल जाहिरातींसाठी देखील नियम असणार आहेत. डिजिटल जाहिरात फलकांची प्रकाशमानता ३.१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. लुकलुकणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यास परवानगी नसणार आहे.

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?
Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

पालिकेच्या नव्या धोरणानुसार, मॉल्स, मल्टिप्लेक्स, वाणिज्य संकुले, वाणिज्य इमारती, पेट्रोल पंप या सर्व ठिकाणी एलईडी जाहिरात फलक प्रदर्शित करण्यास मनाई नसणार आहे. बांधकाम सुरू असलेल्या आणि दुरूस्तीचे काम सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणांवर त्याचसोबत इमारतीच्या बाह्यभागांवर जाहिरातील प्रदर्शित करण्यास परवानगी असेल.

दरम्यान, घाटकोपर येथे मे २०२४ मध्ये होडिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेमध्ये १७ जणांचा मृ्त्यू झाला होता. या होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेने नव्याने जाहिरात फलक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी हे नवीन जाहिरात फलक धोरण जारी करण्यात आले होते. यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने २१ शिफारसी केल्या होत्या. या सर्व शिफारसी लक्षात घेऊन नवीन जाहिरात फलक धोरण तयार करण्यात आले.

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?
Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com