मुंबईमध्ये विषारी ताडीचा संशय; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये टेबलावर कोसळताना दिसला तरुण

Mumbai Toddy Death Case : मुंबईतील अंधेरी पूर्वेच्या एमआयडीसी परिसरात ताडी प्यायल्यानंतर २६ वर्षीय बब्रुवान दुर्गे याचा संशयास्पद मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये तरुण टेबलावर कोसळताना दिसत आहे.
Mumbai Toddy Death Case
Mumbai Toddy Death Case
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात ताडी प्याल्यांनंतर एका २६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बब्रुवान दुर्गे असे मृत तरुणाचे नाव असून, तो सुभाष नगर येथील एका ताडी-माडी केंद्रात ताडी पिण्यासाठी गेला होता. ताडी विषारी असल्यामुळे विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही दृश्यांमध्ये संबंधित तरुण ताडी केंद्रात ताडी पिताना टेबलावर कोसळल्याचे दिसत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक केमिकल रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास बब्रुवान दुर्गे हा अंधेरी पूर्वेतील सुभाष नगर परिसरातील ताडी-माडी केंद्रात ताडी पिण्यासाठी गेला होता. ताडी प्यािल्यानंतर त्याला तिथेच अचानक चक्कर आली आणि तो टेबलावर कोसळल्याचे सीसीटीव्ही दृश्यांतून दिसत आहे. त्यानंतर, रात्री साडेअकराच्या सुमारास दुकान बंद करताना मालकाने त्या तरुणाला दुकानाबाहेर फेकून दिले आणि केंद्र बंद केले, असा गंभीर आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ताडी विषारी असल्याचा कुटुंबीयांचा संशय

अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ताडीतील विषारी घटकांमुळे विषबाधा होऊन बब्रुवानचा मृत्यू झाला, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, ताडीमध्ये नेमके कोणते विषारी पदार्थ होते आणि मृत्यूचा ताडी सेवनाशी थेट संबंध आहे का, हे अद्याप वैद्यकीय अहवालाशिवाय सांगता येणार नाही.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक केमिकल रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

Mumbai Toddy Death Case
राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

पोलीस ठाण्यासमोर संताप आणि आंदोलन

तरुणाच्या अकोली मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्याचा मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आणून जोरदार आंदोलन केले. संबंधित ताडी विक्रेत्याविरोधात जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा किंवा योग्य गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणात स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनीही हस्तक्षेप करत संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. आमदार पटेल आणि पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर अखेर मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mumbai Toddy Death Case
Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

परिसरात भीतीचे वातावरण

एमआयडीसी परिसरात ताडी प्यािल्यानंतर मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नसून, यापूर्वीही अशा घटना घडल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या पोलिसांनी ताडी-माडी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज, तरुणाची वैद्यकीय पार्श्वभूमी, ताडीचे नमुने आणि फॉरेन्सिक अहवालांवर लक्ष केंद्रित केले आहे. ताडी विक्रेत्याच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला का, केंद्रात वेळेवर वैद्यकीय मदत देण्यात आली होती का आणि तरुणाला दुकानाबाहेर टाकल्याचा आरोप खरा आहे का, या सर्व बाजूंचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com