सचिन गाड
मुंबईतील पवई परिसरात आज २३ वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. मुंबई पोलिसांना अवघ्या काही तासात या घटनेचा उलड केला आहे. पवई पोलिसांनी या हत्येप्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
रुपल ओगरे असं मृत तरुणीचं नाव आहे. मरोळ येथील एन जी कॉम्पलेक्समधील राहत्या घरी रुपलचा मृतदेह आज सापडला होता. रुपल बहीण आणि मित्रासोबत येथे राहत होती, मात्र दोघेही कामानिमित्त बाहेर असताना ही दुर्दैवी घटना घडली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रुपल ओगरे सोमवारी पहाटे मुंबईतील मरोळ येथील फ्लॅटमध्ये संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली होती. (Latest Marathi News)
रुपल प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. रुपल मूळची छत्तीसगडची होती. एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती.सोबत राहत असलेली तिची बहीण आणि तिचा मित्र वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. (Crime News)
रुपल रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवर शेवटचे बोलली होती. त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा. आरोपीच्या अटकेनंतर हत्येचं कारण आणि इतर तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.