Mumbai Crime News: मुंबईच्या डोंगरीत 'एनसीबी'ची मोठी कारवाई; ५० कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त

Mumbai Crime News: मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv
Published On

सचिन गाड

Mumbai News: मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तस्करांकडून ५० कोटी किमतीचे 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने डोंगरीत मोठी कारवाई केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरीतील अंमली पदार्थ तस्करांचं जाळ उद्ध्वस्त करत तिघांना अटक केली आहे. या तस्करामध्ये एका महिलेचा देखील सामावेश आहे.

Mumbai Crime News
Borivali Crime News: किरकोळ वाद विकोपाला गेला अन् घडलं भयंकर.. डोक्यात हातोडा घालून एकाची हत्या; परिसरात खळबळ

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तिघांना अटक केली आहे. यांच्याकडून ५० कोटी किमतीचे २० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एमएमआर रिजनमधील या मोठ्या ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. अंमली पदार्थांसहित एक कोटी २० लाख रुपये आणि सोने देखील जप्त केलं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरीतील तस्कर एन. खान याला पकडण्यासाठी जाळं तयार केलं होतं. त्यानंतर डोंगरीतून तस्कर एन. खानला अटक केली. एन. खानला पकडण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वीच माहिती मिळवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींच्या चौकशीनंतर तिघेही गेल्या सात ते दहा वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करायचे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.

Mumbai Crime News
CBI Raid on IAS Dr. Anil Ramod House: CBI कडून अनिल रामोड यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत तपास, 6 कोटींच्या रोकडसह कागदपत्रे जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला तस्कर महिलेचा घराचा पत्ता कळाल्यानंतर तिच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर तिच्या घरातूनच १५ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ तिने घरात लपवून ठेवले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घरातील अंमली पदार्थ शोधले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरी भागात केलेली कारवाई मोठी मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com