Mumbai Local Accident : मुंबईकरांचं मरण स्वस्त आणि जगणं कठीण! २० वर्षांत ५१ हजार बळी घेणारे कोण?

Mumbai Mumbra Local Accident : मुंबईकरांचं मरणं स्वस्त आणि जगणं कठीण, असंच म्हणण्याची वेळ आता आलीय. कारण अशीच व्यवस्था प्रशासनाने मुंबईकरांसाठी केलीय. इथे तुमच्या आयुष्याची किंमत काहीच नाही? जबाबदारी घेणारं कुणीच नाही? असाच प्रश्न पाडणारी धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
Mumbai Mumbra Local Accident
Mumbai Mumbra Local Accident Saam Tv News
Published On

मुंबई : काळजाचा तुकडा गमावल्यानंतरचा एका आईचा आक्रोश.. तीस-बत्तिशीचा केतन सरोज नेहमीसारखा कामाला जायला निघतो आणि लोकलच्या गर्दीत स्वत:ला झोकून देतो. वेगवान गाडीच्या एका वळणावर त्याचा हात सुटतो आणि एका क्षणात सारं काही संपून जातं. दिवा-मुंबई दरम्यान रेल्वे रूळावर चारजण लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडले.मात्र रोजच लोकल अपघातात विविध ठिकाणी दररोज ६ ते ७ लोकांचा जीव जातोय.

मुंबईत राहणं परवडणारं नाही म्हणून मुंबईच्या आजूबाजूला नवी मुंबई आली मुंबईची महामुंबई झाली. ४-४, ५-५ महापालिका मुंबईच्या शेजारी उभ्या राहिल्या. या शहरांची लोकसंख्या दुप्पटीनं, तिप्पटीनं वाढली, वाढतच राहिली. पण पायाभूत सुविधा अश्मयुगीनच राहिल्या. आता दररोज लोकलच्या किती फेऱ्या होतात अन् किती प्रवासी प्रवास करतात त्यावर एक नजर टाकूया.

Mumbai Mumbra Local Accident
Mumbai New Local Train : हवेशीर दरवाजा, छतावर व्हेटिंलेशन युनिट्स, मुंब्रा दुर्घटनेनंतर नव्या लोकलमध्ये अनेक बदल; वाचा सविस्तर

पश्चिम रेल्वे

लोकल फेऱ्या - 1,300

प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2 हजार

प्रत्यक्षात लोकलमधील प्रवासी संख्या 4 हजार ते 6 हजार

रोज प्रवास करणारे प्रवासी 35-40 लाख

मध्य रेल्वे

लोकल फेऱ्या - 1,300

प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2 हजार

प्रत्यक्षात लोकलमधील प्रवासी संख्या 4 हजार ते 6 हजार

रोज प्रवास करणारे प्रवासी 25 लाख आसपास

हार्बर आणि ट्रान्स हार्बर

लोकल फेऱ्या 580

प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2 हजार

प्रत्यक्षात लोकलमधील प्रवासी संख्या 3 हजार ते 5 हजार

रोज प्रवास करणारे प्रवासी 10 ते 12 लाख

Mumbai Mumbra Local Accident
Mumbai Local: मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होणार नवीन ट्रेन, कधीपासून धावणार? तारीख आली समोर

मुंबईत लोकल सुरु होऊन 172 वर्ष पुर्ण झाली पण अजूनही रडत खडत ही लोकल रोजच विलंबानं आणि तुडुंब गर्दीनं धावते म्हणूनच बळींची संख्या रेल्वेच्या वेगापेक्षा दुप्पट. एक नजर टाकूया वर्ष दिड वर्षभरातील अपघातांतील बळींच्या संख्येवर.

लाईफलाईन की डेथलाईन?

2024 मध्ये रुळ ओलांडताना - 1,151 प्रवाशांचा मृत्यू

2024 - ट्रेनमधून पडून सर्वाधिक 116 मृत्यू कल्याणमध्ये

2024 - ठाणे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात 68 प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

2025 मध्ये जानेवारी ते मे दरम्यान 1,003 मृत्यूंची नोंद

507 प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना तर

250 प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

ही झाली वर्ष दिड वर्षांची आकडेवारी मात्र पुढील आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय तुमच्या पायाखालची जमिन हादरेल तुम्ही लोकलमधून प्रवास करायला धजावणार नाही अशी ही धक्कादायक आकडेवारी पाहा.

20 वर्षांत लोकल अपघातात 51 हजार 802 बळी

2005 ते 2024 पर्यंत 51,802 प्रवाशांचा बळी

कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवलीत सर्वाधिक बळी

Mumbai Mumbra Local Accident
Mumbra Local Accident : स्वप्नातलं घर घ्यायला बाहेर पडला, IT इंजिनीअरचा ट्रेनमधून हात घसरला; ठाण्यातील मयूरचं घराचं स्वप्न अधुरं

मुंबईत बाहेरुन घाम गाळायला येणाऱ्यांची संख्या मोठीये. यांना ना मेट्रोचा फायदा, ना बुलेट ट्रेनचा, ना मोनोचा, ना कोस्टल रोडचा, ना सीलिंकचा, ना अटल सेतूचा. पोटासाठी गर्दीत गुदमरत तीन साडेतीन तास प्रवास करायचा तोही फक्त आणि फक्त लोकलनेच, आणि म्हणूनच मुंबई स्पिरीटच्या गोंडस नावानं धावणाऱ्या आणि केंद्राला ५ लाख कोटींचा टॅक्स मिळवून देणाऱ्या मुंबईतल्या सामान्य माणसाचं हे लटकत लोंबकळत गाडीच्या वेळापत्रकावरचं 'जगणं कुणाला ना सोयरं ना सुतक, त्याचं मरण स्वस्त आणि जगणं कठीण'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com