58 ठिकाणी कंत्राटदाराच्या चुका, तरी मेट्रोचं कंत्राट; मुलुंड दुर्घटनेनंतर भाजप आमदाराने केली पोलखोल

mihir kotecha on mulund incident : मुलुंड दुर्घटनेनंतर भाजप आमदाराने MMRDAची पोलखोल केली आहे. भाजप आमदाराच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
mihir kotecha
mihir kotecha on mulund incidentSaam tv
Published On

मुंबईच्या मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. एमएमआरडीए आणि मेट्रोच्या कंत्राटदारावर विरोधकांसहित सत्ताधारी भाजप आमदारही तुटून पडले आहेत. आमदार मिहिर कोटेचा यांनी ५८ ठिकाणी चुका करणाऱ्यालाच 'एमएमआरडीए'ने पुन्हा कंत्राट दिल्याचा दावा केला आहे.

mihir kotecha
लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार; पहिला हप्ता २० हजारांचा असणार, जाणून घ्या अटी आणि पात्रता?

आमदार कोटेचा काय म्हणाले?

आमदार मिहिर कोटेचा यांनी म्हटलं की, 'जेव्हा मेट्रोचा काम सुरू झालं. पाया भरणीच्या वेळी 58 ठिकाणी याच कंत्राटदाराने चुका केल्या होत्या. त्या चुका आम्ही एमएमआरडीएला दाखवून दिल्या होत्या. तरीही 'एमएमआरडीए'ने त्याच मिलन कंपनीला कंत्राट दिल्याने हा अपघात घडला'. मिहिर कोटेचा यांनी आरोप करून एमएमआरडीएची पोलखोल केली आहे.

उपमहापौर काय म्हणाले?

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुलुंड दुर्घटनेतील जखमेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुंबईकरांचा जीव महायुतीसाठी महत्त्वाचाच आहे. विरोधक अशा प्रकारे टीका करत राहतील. मात्र यात कुठलेही राजकारण न करता दोषी कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याचा आमचा आग्रह असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. काल रात्री बसवलेला ब्लॉक आज सकाळी कोसळतो म्हणजेच यात कुठल्या प्रकारचा माल वापरला गेलाय. काम निकृष्टपणाचं झाले का, याचा देखील तपास केला जाईल, असे संजय घाडी यांनी सांगितले .

mihir kotecha
माजी खासदाराच्या शूटरची १५ गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 'मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला असून ३-४ जण जखमी आहेत. ‘सो कॉल्ड इन्फ्रा मॅन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? की यातील भ्रष्टाचारात त्यांचीही भागीदारी असल्याने मलमपट्टी करण्यासाठी पुन्हा काहीतरी दुसरे मुद्दे काढून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील? एमएमआरडीए जबाबदारी घेणार का? हे कोणते कंत्राटदार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

'मेट्रोची काम लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? यात सामन्यांचा जीव जातोय. मेट्रोची काम किती वेगाने सुरू आहे, दाखवण्याचा नादात त्याचा दर्जा आणि सुरक्षा प्रशासन बघणार आहे की नाही? मुंबईकर एकतर खड्ड्यात नाहीतर मेट्रो बांधकामादरम्यान होणाऱ्या जिवघेण्या अपघातात भरडला जात आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

mihir kotecha
Valentine Day Tragedy : व्हॅलेंटाइन डेला प्रेमाचा भयानक शेवट; बंद कारमध्ये आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह

सरकारकडून मृतांच्या वारसांना मदत

मुलुंडभागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. दुर्घटनेत काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com