MulundNews: मुंबईत स्वतःचे हक्काचं घर असावे या लालसे पोटी एका केअर टेकरने वयोवृद्ध दांपत्याला लुटल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. अमित वामने असं या चाळीस वर्षे तरुणाचं नाव त्याने तब्बल १ कोटी ३८ लाखाची चोरी केली आहे. हा तरुण मुलुंड मधील कारिया या वृद्ध दांपत्याकडे गेल्या सहा वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करत होता. या चोरीचा त्याने सहा महिन्यांपूर्वीच प्लॅन केल्याचेही समोर आले आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अमित वामने हा तरुण मुलुंड मधील कारिया या वृद्ध दांपत्याकडे सहा वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करत होता. सहा महिन्यांपासून त्याने त्यांच्या घरामध्ये चोरी करण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने फ्लॅटची डुप्लिकेट चावी देखील बनवून ठेवली होती. 10 एप्रिल ते अठरा एप्रिलच्या दरम्यान हे वृद्ध दांपत्य इस्पितळात होते.
याचाच फायदा घेत आरोपीने इमारतीच्या वॉचमॅनच्या संगनमताने दहा तारखेला इमारतीचे सीसीटीव्ही बंद करायला सांगितले. यानंतर इमारतीत शिरून कारीया कुटुंबीयांचा फ्लॅट उघडून कपाटातील सोने चांदी हिरे आणि दोन लाखांची रोख रक्कम असा मिळून १ करोड ३८ लाखांचा मुद्देमाल घेऊन तो फरार झाला. (Latest Marathi News)
18 तारखेला कारिया कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी एके दिवशी कपाटाची चावी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना चावी मिळाली नाही म्हणून त्यांनी चावी वाल्याकडून डुप्लिकेट चावी बनवून कपाट उघडले असता कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आणि पैसे गायब असल्यास त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मुलुंड पोलिसात 28 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर दोन दिवसात पोलिसांनी घरातील नोकरांची आणि या केअरटेकरची चौकशी केली ज्यामध्ये केअरटेकरने आपणच ही चोरी केल्याची कबुली दिली. अमित वामने हा सध्या अटकेत असून त्याचा साथीदार वॉचमन सध्या फरार आहे त्याचा शोध मुलुंड पोलीस घेत आहेत. (Crime News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.