Mumbai Metro Line 4 च्या कामामुळे ठाण्यातील 'हे' रस्ते १४ जुलैपर्यंत बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Metro प्रकल्पांर्गत ठाण्यामध्ये स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याच्या कामासाठी ठाण्यातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे. यामुळे १४ जुलैपासून रात्री ११ ते पहाटे ४ या कालावधीत घोडबंदर रोडवरुन प्रवास करता येणार नाही.
Mumbai Metro Line 4
Mumbai Metro Line 4 x
Published On

ठाणे : मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पांच्या अंतर्गत स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यानुसार, २२ जून ते १४ जुलै या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत घोडबंदर रोडवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा या दोन प्रमुख भागांमध्ये केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण म्हणजेच एमएमआरडीए आणि त्यांचे भागीदार हे काम रात्रीच्या वेळेत पूर्ण करणार आहेत. वाहतुकीचा अडथळा कमी व्हावा या उद्देशाने ही कामे रात्री केली जाणार आहेत.

Mumbai Metro Line 4
Abu Azmi : आषाढी वारीबाबत अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य; वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही रस्त्यावर नमाज पठन केल्यावर मात्र...

वाहतुकीसाठी नवे मार्ग:

जड वाहनांसाठी पिलर क्रमांक ८५ जवळून गायमुख दिशेने जाण्यास मनाई असेल. त्यांना यू-टर्न घेऊन पोरबंदर ठाणे मुख्य रस्त्यावर जावे लागेल. त्यानंतर पिलर १०२ वरुन उजवीकडे वळून मुख्य मार्गावर परत यावे लागेल. इतर हलक्या वाहनांसाठीची वाहतूक पिलर ८५ जवळील सर्व्हिस रोडवर वळवली जाईल. त्यानंतर इंडियन ऑइल पंपजवळ पुन्हा मुख्य रस्त्यावरुन प्रवास करता येईल.

Mumbai Metro Line 4
Sanjay Raut : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच एकनाथ शिंदेंकडे दिलेला, पण...; शिंदेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

ठाण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग :

घोडबंदर बाजूने ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना नागला बंदर आणि आशा वाईन शॉपजवळ थांबवण्यात येईल. त्यानंतर नागला बंदर डेपोमधून वळसा घेऊन लोढा स्प्लेंडोरा कॉम्प्लेक्सजवळील मुख्य रस्त्यावर येऊन प्रवास सुरु ठेवावा लागेल. रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिस, ऑक्सिजन टँकर यांसारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

Mumbai Metro Line 4
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com