

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा आणि वेगवान होणार आहे. अंधेरी-खार मेट्रोसेवा लवकरच सुरू होणार आहे. मेट्रो- २ ब मार्गिकेतील टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे. अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो- २ ब मार्गिकेतील अंधेरी पश्चिम ते सारस्वत नगर टप्पा २ च्या कामाला वेग आला असून काम अंतिम टप्प्यात आहे. एमएमआरडीकडून या मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. या मार्गिकेवर आता फक्त ३ गर्डरच्या उभारणीचे काम शिल्लक आहे. हे काम आता येत्या ८ ते १० दिवसांत पूर्ण केले जाईल असे सांगितले जात आहे.
अंधेरी पश्चिम ते सारस्वत नगर टप्पा २ चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणेची कामे पूर्ण करून या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाईल. त्यानंतर हा मेट्रो मार्ग मार्च २०२७ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत आणला जाईल. यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न केले जात आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर अंधेरी आणि खार येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. या मेट्रोद्वारे अंधेरीवरून थेट खारला प्रवास करता येईल. त्याचसोबत काशीगाव ते खार पश्चिम असा देखील प्रवास मेट्रो प्रवाशांना करता येईल. यामुळे हा प्रवास जलद, आरामदायी आणि गारेगार होणार आहे.
एमएमआरडीएने अंधेरी पश्चिम ते खार पश्चिम हा मेट्रो मार्ग मार्चपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. हा मेट्रो मार्ग ७.५३ किमीचा आहे. एमएमआरडीएकडून दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो- २ अ मार्गिकेचा विस्तार अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द असा मेट्रो-२ ब मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच मेट्रो- २ मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत आली. या १८.६ कमीच्या या मार्गिकेमुळे काशीगाव (मिरारोड) ते अंधेरी पश्चिम असा मेट्रो प्रावस करणं सोपं होईल. तर सारस्वत नगर ते चेंबूर असा १०.३ किमीचा टप्पा -३ २०२८ पर्यंत कार्यन्वितत करण्यात येण्याचा अंदाज आहे.
या मेट्रो मार्गाचे काम करत असताना काही तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. हा मेट्रो मार्ग मार्च २०२७ मध्ये सुरू करण्याचे जरी एमएमआरडीएचे प्रयत्न असले तरी देखील काही तांत्रिक अडचणींमुळे कामात विलंब होत आहे. या मेट्रोच्या उर्वरीत कामासाठी गर्डर उभारणी करण्यासाठी क्रेन उभी करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता आहे. ही जागा मिळावी यासाठी मार्गिकलगतची एक इमारत पाडणे गरजेचे आहे. पण या इमारतीच्या पाडकामाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे १८५ मीटर मार्गेकेच्या कामाला विलंब होत आहे. हा टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केला जाईल असे सांगितले जात आहे. पण या विलंबामुळेच हा मेट्रो मार्ग जून- जुले २०२७ मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.