Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Mumbai Metro News : नवरात्रीत गरबा-दांडियासाठी जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा! १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांवर रात्री १२.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार.
Mumbai Metro News
Mumbai Metro NewsAI Image
Published On: 
Summary
  • नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांच्या वेळेत वाढ

  • १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान रात्री १२.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध राहणार

  • मेट्रो २ अ, २ ब, ७ आणि ९ या मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या

  • अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन दर १५ मिनिटांच्या अंतराने

नवरात्रीच्या उत्सवादरम्यान गरब्याचा आनंद लुटणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांना घरी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यानुसार, १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत संबंधित मेट्रो मार्गिकांवर रात्री १२.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चार मेट्रो मार्गिकांवर अतिरिक्त सेवा

एमएमआरडीएच्या निर्णयानुसार, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, काशीगाव ते दहिसर मेट्रो ९ (पहिला टप्पा) आणि मंडाले ते चेंबूर मेट्रो २ ब (पहिला टप्पा) या चार मार्गिकांवरील मेट्रो सेवा वाढवण्यात येणार आहे. नवरात्रीच्या शेवटच्या पाच दिवसांत रात्री उशिरापर्यंत मेट्रो उपलब्ध असल्याने गरबा आणि दांडियासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Mumbai Metro News
Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत दर १५ मिनिटांच्या अंतराने अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो २ अ मार्गिकेवर १० अतिरिक्त फेऱ्या, तर मेट्रो ७ आणि मेट्रो ९ मार्गिकांवर प्रत्येकी १४ अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. तसेच, मेट्रो २ ब मार्गिकेवर १५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना मेट्रोची सेवा अधिक काळ उपलब्ध होणार आहे.

Mumbai Metro News
Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

गणेशोत्सवातही केला होता वेळेत बदल

यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळातही प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली होती. त्या वेळी या चार मार्गिकांसह आरे ते कफ परेड मेट्रो ३ आणि वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ या मार्गिकांवरही दहा दिवस अतिरिक्त सेवा देण्यात आली होती. सध्या मुंबईतील मेट्रो सेवा दररोज सकाळी ५.५० ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रात्री १२.३० वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेषतः रात्री उशिरा घरी परतणाऱ्या महिला, तरुण आणि कुटुंबांना या सुविधेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com