चुकीचा सिग्नल दिल्यामुळे कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर गेली आहे. त्यामुळे मालगाडी अडकून पडली असून कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग आणि बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म असे दोन्ही मार्ग झाले बंद झाले आहेत. कर्जतकडे जाणारी संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मालगाडी मुख्य मार्गावर आणण्यासाठी आणखी तासभर वेळ लागण्याची शक्यता आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दोन सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बदलापूर स्टेशनवर मालगाडीला चुकीचा सिग्नल मिळाला आणि मालगाडी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर गेली. त्यामुळे कर्जत आणि बदलापूर दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. मालगाडी मूळ ट्रॅकवर आणण्यासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
ऑफिसमधून घरी निघण्याच्या वेळेलाच ही समस्य़ा निर्माण झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ऑफिसवरून घराच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांची गर्दी झाली असून ते लोकलची वाट पाहत आहेत. काही प्रवाशी स्टेशनवर न थांबता मिळेल त्या वाहनाने घरी निघाले आहेत.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकावर अडकून पडली आहे. सायंकाळी चार वाजून 45 मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली. मालगाडी फलाट क्रमांक दोन वरून पास होणं अपेक्षित होतं, मात्र मालगाडी थेट होम प्लॅटफॉर्मच्या दिशेने गेल्याने मोटर म्हणने गाडी थांबवली. याची कल्पना स्टेशन प्रबंधकांना दिली. मात्र दोन रेल्वे रुळांवर गाडी अडकल्याने दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.