Mumbai Local Train : मेल आणि एक्स्प्रेसमुळे लोकल प्रवाशांना लेटमार्क? रेल्वे संघटनांचा आरोप, उगारलं आंदोलनाचं हत्यार

Mumbai Local Train issue : मेल आणि एक्स्प्रेसमुळे लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत,असा आरोप करत रेल्वे संघटनांनी आंदोलनाचं हत्यार पुकारलं आहे. सर्व रेल्वे संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाची तयारी केली आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local Central LineSaam TV
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबई शहरात काही दिवसांपासून लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात लेटमार्क लागत आहे. मागील काही दिवसांत ओव्हरहेड वायर तुटणे, व्हायरहेड वायरवर बांबू पडणे अशा घटनांमुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला होता. दररोजच्या प्रवासात मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनला अधिक प्राधान्य दिल्याने लोकल उशिराने धावतात. त्यामुळे कार्यालय गाठण्यास उशीर होतो, असा आरोप करत रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी मुंबई लोकल रेल्वे प्रश्नांचा बळी देत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. मेल आणि एक्स्प्रेसमुळे रोजच उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, असाही संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे रेल्वेतील विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

कळवा-ऐरोली लिंक आणि ५ -६ मार्गिका सारखे महत्वाचे प्रकल्प वर्षानुवर्षे MRVCकडून रखडलेले आहेत. कुर्ला-ठाणे, कल्याण ५-६ मार्गिका तयार आहेत. तरी लोकलच्या मर्गिकेवर रात्रंदिवस मेल चालवल्या जात आहेत. या मार्गावर लोकल रेल्वे वेळेवर चालवाव्यात, अशी संघटनांची मागणी आहे.

Mumbai Local Train
Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये १३०० हून अधिक जागांसाठी बंपर भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी २२ ऑगस्ट रोजी पांढरे कपडे घालून पट्टी लावून प्रवास करावा आणि पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन रेल्वे संघनटनांनी प्रवाशांना केले आहे. या आंदोलनानंतर सुद्धा रेल्वे प्रशासन जागे झाले नाही, तर टप्याटप्याने आंदोलन तीव्र होत जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.

Mumbai Local Train
Kasara Railway Station : लोकल ट्रेनच्या कॅबिनमध्ये घुसून केला व्हिडीओ; दोन तरुणांना घेतले ताब्यात

किसान रेल्वे पुन्हा सुरू करावी, केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

जळगावच्या रावेर तालुक्यातील रावेर निंभोरा आणि सावदा अशा रेल्वेस्थानकावरून रेल्वेद्वारे केळीची वाहतूक केली जात आहे. व्हीपीएन रेल्वे बोगीद्वारे या केळीची दिल्ली येथील आजादपुर येथे वाहतूक केली जात आहे. याच व्हीपीएन रेल्वेच्या बोगीमुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे व्हीपीएन रेल्वे बंद करून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com