Mumbai Local : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून मालाडच्या फलाट क्रमांकांत मोठे बदल, जाणून घ्या...

Mumbai Local western railway malad station platform numbers changes : मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात नवीन मार्गिका अन् फलाट उभारले जात आहे. त्यामुळे फलाटांचेही क्रमांक देखील बदलण्यात येत आहेत.
मालाडच्या फलाट क्रमांकांत मोठे बदल
malad station platform numbers changes Saam Tv
Published On

मुंबई : मुंबई लोकलसंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. मालाड रेल्वे स्थानकामध्ये नवी मार्गिका अन् नवे फलाट उभारण्यात येत आहेत. त्यामुळे फलाटांचे क्रमांक देखील बदलण्यात येणार असल्याची माहिती मिड डेच्या हवाल्यानुसार मिळतेय. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मालाड स्थानकावरील बोर्डिंग आणि डिबोर्डिंग प्लॅटफॉर्ममध्ये बदल जाहीर केलेत.

मालाडच्या फलाट क्रमांकांत बदल

गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाईनच्या कामाच्या संदर्भात मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामामुळे मालाड स्टेशनवरील बोर्डिंग आणि डिबोर्डिंग प्लॅटफॉर्म बदलतील, असं पश्चिम रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात (Mumbai Local News) म्हटलंय. नेमकं आता कोणत्या फलाटांमध्ये बदल झालाय. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी नवीन रूपरेषा सांगितली आहे, ते आपण सविस्तर जाणून घेवू या.

काय आहेत बदल?

प्लॅटफॉर्म क्रमांक १ : फलाट क्रमांक १ वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. परंतु आता चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार (western railway malad station platform) आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून हे बदल लागू होतील.

प्लॅटफॉर्म क्रमांक २ : ८ सप्टेंबरपासून चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या-उतरण्यासाठी करावा लागणार आहे.

मालाडच्या फलाट क्रमांकांत मोठे बदल
Mumbai Local Train : मुंबईकरांचा रविवारी होणार खोळंबा, आज मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा वेळापत्रक

प्लॅटफॉर्म क्रमांक ३ : २२ सप्टेंबरपासून विरार दिशेला जाणाऱ्या जलद लोकलमधील पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर (Mumbai Local Update) करावा लागणार आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक ४ : २९ सप्टेंबरपासून चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या-उतरण्यासाठी करावा लागणार आहे.

हे बदल स्टेशन कार्यक्षमता सुधारण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रयत्नांचा एक (malad station platform update)भाग आहेत. प्रवाशांनी या बदलांबद्दल जागरूक राहण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलंय. यानुसार प्रवासाचं नियोजन करावं, असं पश्चिम रेल्वेनं निवेदनात म्हटलंय.

मालाडच्या फलाट क्रमांकांत मोठे बदल
Mumbai Local Train : हार्बर मार्गावरील अनेक लोकल खोळंबल्या, प्रवाशांची मोठी धावपळ; वाशी स्टेशनजवळ काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com