Mumbai Local Mega Block : आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block At 28 July: रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक,  प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक
Mumbai Local Mega Block Saam TV
Published On

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी लोकलने प्रवास करणे मुंबईकरांसाठी खूपच त्रासदायक ठरणार आहे. कारण २८ जुलै २०२४ रोजी म्हणजेच रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी मेगाब्लाक नसणा आहे. पण पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. बोरिवली ते भाईंदर अप- डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक,  प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक
Air Taxi in Mumbai: आता ट्राफिकची चिंता मिटली; मुंबईत लवकरच एअर टॅक्सी उडणार

मध्य रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ .०५ वाजल्यापासून ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक,  प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक
Mumbai Crime: २२ टॅटू, गुटखा आणि ऑनलाइन पेमेंट; स्पा सेंटरमध्ये चुलबुल पांडेच्या हत्येचा असा झाला पर्दाफाश!

हार्बर रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक -

रविवारी हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर पनवेल येथून ठाणेकरता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बरवरील लोकलसेवा सुरू राहतील.

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक,  प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक
No Water Cut in Mumbai: मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?

पश्चिम रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत बोरिवली ते भाईंदर अप आणि डाउन धीम्या मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकलसेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉग कालावधीत काही लोकलसेवा रद्द असणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक,  प्रवाशांचे होणार हाल; पाहा वेळापत्रक
Mumbai Road Potholes: रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात..., मराठमोळ्या अभिनेत्याची मुंबईच्या रस्त्यांबद्दल संतप्त पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com