मुंबईकरांना सर्वात मोठी दोखेदुखी म्हणजे वाहतूक कोंडी. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि गाड्यांमुळे सर्वत्र वाहातूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
वाहतूक कोंडीमुळे तुमचा वेळ आणि इंधन दोन्हीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि सोबत वातावरणातील हवेमध्ये देखील प्रदूषण पहायला मिळते.
परंतु, या वहातूक कोंडीच्या समस्यावर प्रशासनाकडून आता तोडगा काढण्यात आला आहे. प्रशासने लवकरच मुंबई आणि दिल्लीमध्ये एअर टॅक्सी सुरु करण्याची माहिती दिली आहे.
एअर टॅक्सीच्या प्रक्लपामुळे नागरीकांचा वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे त्यासोबतच टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येत्या २ वर्षात म्हणजेच २०२६ पर्यंत एअर टॅक्सीचा प्रकल्प सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे. एअर टॅक्सीचा प्रकल्प सुरु करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एका समितीची स्थापना केली आहे.
एअर टॅक्सीच्या तांत्रिक तपासणीचं काम 'अॅडव्हान्स्ड एअर मोबिलिटी स्टडी ग्रुप' ही समिती करणार आहे. माहितीनुसार, मुंबईनंतर दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादमध्येंही एअर टॅक्सीची सेवा सुरू करण्यात येणार आहे.
एअर टॅक्सी सुरु झाल्यामुळे नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार त्यासोबतच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होणार आहे. एअर टॅक्सीमुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत देखील मोठा फायदा होणार आहे. एअर टॅक्सीमुळे एकूण ९० मिनिटांचा प्रवास ७ मिनिटांत होईल अशी मान्यता आहे.
भारतात एअर टॅक्सीचे प्रकल्प सुरु करण्यासाठी इंटर ग्लोब इंटरप्रायजेस आणि अमेरिकेतील आर्चर एव्हीएशन या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. या कंपन्यांच्या भागीदारीच्या माध्यमातून २०२६ पर्यंत भारतात एअर टॅक्सी सुरु करण्याचा विचार आहे.
Edited By : Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.