रेल्वेच्या हार्बर मार्गावर ४२ तासांच्या मेगाब्लॉकनंतरही प्रवाशांचे हाल सुरुच आहेत. सलग सुट्ट्यांनंतर कामावर निघालेल्या प्रवाशांना हार्बर मार्गावरील रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा सामना करावा लागत आहे.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी आणि डाऊन पनवेल दिशेच्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. कामाचा दिवस असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होती. मात्र काल संपलेल्या मोठ्या मेगाब्लॉकनंतरही प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. (Railway News)
पनवेल येथे सकाळी 5.35 ते 7.25 या वेळेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या पुन्हा उशीराने धावत आहे. पनवेलकडे जाणार्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर उपनगरीय गाड्या बेलापूर-पनवेल दरम्यान 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. वाशी आणि बेलापूरकडे जाणाऱ्या गाड्या योग्य वेळेत धावत आहेत. (Latest News Update)
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता या मार्गावर पाच दिवसांचा ब्लॉक घेणार आहे.
२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत रात्री १२.३० ते ५.३० तास या ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.