Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक
Navi Mumbai AC LocalSaam Tv

Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक

Navi Mumbai AC Local News: हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून १४ एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. या लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील आणि रविवारी सेवा बंद राहतील.
Published on

Summary -

  • नवी मुंबईकरांसाठी हार्बर मार्गावर १४ एसी लोकल सुरू

  • सीएसएमटी ते पनवेलदरम्यानचा प्रवास होणार गारेगार आणि आरामदायी

  • सोमवार ते शनिवार एसी लोकल सेवा राहणार सुरू

  • रविवारी एसी लोकल सेवा राहणार बंद

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचे खास गिफ्ट मिळाले. आजपासून नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान १४ एसी लोकल धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली एसी लोकलसेवा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ही सेवा आजपासून सुरू झाली आहे. आजपासून ही सेवा सुरू होत असून मध्य रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. सुरुवातीला हार्बर मार्गावर दिवसभरात १४ लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांची एसी लोकलची मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक
Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

संध्याकाळच्या पीक अवरमध्ये मध्य रेल्वेकडून दोन एसी लोकल चालवण्यात येणार असून त्यापैकी एक वडाळा रोडवरून तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सुटेल. या प्रवासामुळे नवी मुंबईला जणाऱ्यांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होणार आहे. ही लोकलसेवा सोमवार ते शनिवार या दिवशी सुरू राहणार आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन या मार्गावर प्रत्येक ७ एसी लोकल धावतील. रविवारी एसी लोकल फेऱ्या बंद राहतील. त्याऐवजी सामान्य लोकल धावतील.

Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकल प्रवास होणार गर्दी मुक्त, आता १८ डब्यांची उपनगरीय रेल्वे धावणार

हार्बर रेल्वे मार्गावर धावणाफऱ्या एसी लोकलचे वेळापत्रक देखील समोर आले आहे. सकाळी ९.०९ वाजताची पनवेल-सीएसएमटी आणि सायंकाळी ५.३० वाजताची वडाळा रोड-पनवेल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-पनवेल या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. या लोकलच्या जागी एसी लोकल धावतील. सोमवार ते शनिवार दरम्यान वाशी ते वडाळा रोड, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते वाशी, वडाळा रोड ते पनवेल या अप आणि डाऊन मार्गावर एसी लोकल धावतील.

Mumbai Local: नवी मुंबईकरांना मोठं गिफ्ट! आजपासून हार्बर मार्गावर धावणार १४ एसी लोकल; आताच पाहा वेळापत्रक
Mumbai local : मुंबई हादरली, लोकल स्टेशनवर प्राध्यपकाची हत्या, भरगर्दीत चाकूने सपासप केले वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com