मुंबई : कांजूरमार्ग (kanjurmarg) परिसरातील जमिनीच्या मालकी हक्कावरुन निर्माण झालेल्या वादानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले हाेते. या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून मंगळवारी युक्तिवाद झाल्यानंर आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. या सूचनेमुळे कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड (Kanjurmarg Metro Car Shed) प्रकल्पावरुन ठाकरे सरकार (Maharashtra Government) आणि माेदी सरकार (Central Government) यांच्यातील रंगलेल्या वादात ठाकरे सरकारला दिलासा मिळाला आहे. (Kanjurmarg Car Shed Latest Marathi News)
कांजूरमार्गातील नियाेजीत मेट्रो कारशेड येथील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा आदर्श वॉटर पार्कने (Adarsh Water Parks and Resorts Private Limited) केला होता. या विरोधात राज्य सरकारने न्यायालयाची पायरी चढली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनूसार आदर्श वॉटर पार्कला दणका बसला आहे. आदर्श वॉटर पार्कचा जमीनीवरील दावा न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला देखील दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
आदर्श वॉटर पार्कने जमीन फसवणुक करुन घेतल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याबराेबरच आदर्श वॉटर पार्कचे मालकी हक्क देखील रद्द केले. आदर्श वॉटर पार्कने अयाेग्य पद्धतीने जमिन घेतल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
दरम्यान मेट्रो कारशेडच्या काम राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी मालकी हक्क सांगितल्याने या दाेन सरकारामध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे न्यायालयाने देखील या कामास स्थगिती दिली हाेती. आज आदर्श वॉटर पार्कच्या मालकी हक्क रद्द न्यायालयात रद्द झाल्याने या प्रकल्पातील एक अडथळा दूर झाला आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद मिटल्यास या प्रकल्पाचे काम जाेमाने सुरु हाेईल अशी आशा आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.