CCTV grab showing the moment gas-filled balloons exploded inside a residential lift in Goregaon, Mumbai.
CCTV grab showing the moment gas-filled balloons exploded inside a residential lift in Goregaon, Mumbai.Saam Tv

दोन तरुण अन् एक तरुणी लिफ्टमध्ये, अचानक मोठा स्फोट झाला, हादरवणारा थरार CCTV मध्ये कैद|VIDEO

Goregaon Anmol Tower Lift Blast CCTV Video: मुंबईतील गोरेगाव येथील अनमोल टॉवरमध्ये गॅसने भरलेल्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तिघे जखमी झाले आहेत.
Published on

घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो वाढदिवस, साखरपुडा किंवा अन्य समारंभ सजावटीसाठी फुग्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या विशेषतः गॅसने भरलेल्या फुग्यांचा वापर वाढलेला दिसून येतो. मात्र हेच गॅसचे फुगे किती धोकादायक ठरू शकतात, याची धक्कादायक प्रचिती मुंबईतील गोरेगावमध्ये घडलेल्या एका घटनेतून समोर आली आहे.

गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक भयंकर स्फोट झाला आणि लिफ्टमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून राहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

या सीसीटीव्हीमधील दृश्यानुसार एक तरुणी लिफ्टच्या आतमध्ये जाताना दिसते. तिच्या हातामध्ये सुटकेस ही आहे. तिच्यापाठोपाठ एक फुगे विक्रेता गॅसने भरलेले फुगे एका मोठ्या पिशवीतून घेऊन आतमध्ये शिरतो. त्याच्याच मागे आणखी एक मुलगा लिफ्टच्या आतमध्ये येतो. लिफ्टचा दरवाजा बंद होणार तेवढ्यात भीषण स्फोट होतो. ज्यामध्ये लिफ्टच्या आत असलेले तिघेही जण जखमी झाले आहे. तरुणी ती बॅग तशीच सोडून बाहेर धूम ठोकते. या घटनेमध्ये थोडक्यात मोठा अनर्थ होताना टळला. नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

CCTV grab showing the moment gas-filled balloons exploded inside a residential lift in Goregaon, Mumbai.
Pune : तुझ्यामुळे ब्रेकअप झालं; मित्राकडून मित्रावर कोयत्याने घाव, रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गोरेगाव पोलिसांनी गॅस फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस फुगे घेऊन प्रवास करणे जीव घेणं ठरू शकतं याचं हे उदाहरण म्हणता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com