सचिन गाड, मुंबई
मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम पूर्ण करण्याची डेडलाईन आणखी एक वर्षभरानं वाढवली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही महामार्गावरील खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. डिसेंबर २०२३ चा मुहूर्त हुकल्याची कबुली प्रशासनाने कोर्टात दिली. त्यानंतर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर कोर्टानेही नाराजी व्यक्ती केली आहे. (Latest Marathi News)
राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या वेळकाढूपणावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. महामार्गाबाबत केंद्राने समिती नेमूनही कोर्टाने निर्देश देऊनही काही काम न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. यानंतर आता राज्य सरकारने पाचवा टप्पा आता ३१ डिसेंबर २०२४ रोजी पूर्ण होईल, असा दावा केला आहे. (mumbai-goa highway news today)
गणेशोत्सवात (Ganesh Festival) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खड्ड्यातूनच करावा लागणार आहे. २०११ साली पूर्ण होणारा प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. यावरून कोर्टाने राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. अशा विलंबामुळे खर्च वाढतो. शेवटी हा पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असल्याचे हायकोर्टाने म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) वाढीव खर्चाला कोण जबाबदार, असा सवाल करत हायकोर्टाने सरकारला प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी हायकोर्टाने नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाने निर्देश देत
या महामर्गावरुन निर्देश देत हायकोर्टाने ओवैस पेचकर यांची याचिका निकाली काढली. यावेळी कोर्टाने वर्षभरात प्रकल्प पूर्ण न झाल्यास याचिकाकर्त्यांना अवमान याचिका दाखल करण्याची मुभा दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.