Mumbai Goa Highway : रस्त्याचा पत्ता नाही अन् टोलची घाई, मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामावरून प्रवासी संतापले

Mumbai Goa Highway Toll News : मुंबई–गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांदरम्यानच टोल वसुली सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. १७ वर्षांपासून रखडलेल्या कामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
MUMBAI GOA HIGHWAY TOLL COLLECTION ON INCOMPLETE ROAD SPARKS PUBLIC OUTRAGE
MUMBAI GOA HIGHWAY TOLL COLLECTION ON INCOMPLETE ROAD SPARKS PUBLIC OUTRAGESaam tv
Published On
Summary
  • १७ वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम अपूर्ण

  • अपूर्ण कामांदरम्यानच टोल वसुली सुरू

  • प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

  • पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच खराब

  • “रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या” अशी मागणी

सचिन कदम, रायगड

मुंबई–गोवा महामार्गावरील काम रखडलेलं असताना देखील प्रशासनाने टोल वसुली सुरू केल्याचे समोर आले आहे. तब्बल १७ वर्षांपासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय असून काही महत्त्वाची कामे अद्याप अर्धवटच आहेत. तरी देखील प्रशासनाकडून टोल आकारल्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नागोठणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेळी खिंड परिसरातील रस्त्याचे काम, तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपास मार्गांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. याशिवाय सर्व्हिस रोडची कामेही अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते.

MUMBAI GOA HIGHWAY TOLL COLLECTION ON INCOMPLETE ROAD SPARKS PUBLIC OUTRAGE
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

दरम्यान, पनवेल आणि पेण दरम्यान असलेल्या खारपाडा टोल नाक्यावर प्रशासनाने अचानक टोल वसुली सुरू केली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना आणि अधिकृत लोकार्पणही न झालेल्या परिस्थितीत टोल आकारणी सुरू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूककोंडी असते.

MUMBAI GOA HIGHWAY TOLL COLLECTION ON INCOMPLETE ROAD SPARKS PUBLIC OUTRAGE
Shocking : शिक्षकाने विद्यार्थिनीला झाडू मारण्याच्या बहाण्याने बोलावलं; अश्लील व्हिडिओ दाखवून केला लैंगिक अत्याचार, जळगावात खळबळ

विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात या महामार्गावर तासंतास ट्रॅफिक जॅम होत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. “रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या” अशी ठाम भूमिका प्रवाशांनी घेतली आहे.दरम्यान प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com