Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?

Mumbai elevated forest walkway: मुंबईच्या मलबार हिल परिसरात बीएमसीचा ड्रीम प्रोजेक्ट एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे तयार होत आहे. हा वॉकवे लवकरच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत घ्या जाणून....
Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Mumbai elevated forest walkwaySaam Tv
Published On

मुंबईच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारा आणखी एक नवा प्रोजेक्ट लवकरच मुंबईकरांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. मुंबईतील पहिली तरंगती पायवाट म्हणजेच एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे बांधण्यात येत आहे. मलबार हिलच्या हिरवेगार गर्द झाडीतून हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आला आहे. ज्यावरून गिरगाव चौपाटीचे सौंदर्य पाहायला मिळणार आहे. बीएमसीच्या या प्रोजेक्टचे काम कुठपर्यंत आले आहे आणि हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे कधी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

वॉकवे बांधताना आले अडथळे -

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४८२ मीटर लांबीच्या या एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हा वॉकवे बांधत असताना मर्यादित कामाच्या तासांपर्यंत वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासह अनेक आव्हानांना बीएमसीला सामोरे जावे लागले आहे. हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे कोणत्याही झाडांना हानी न पोहचवता तयार करण्यात आला आहे.

Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Mumbai Pune Hyperloop: भारताचा पहिला 'हायपरलूप प्रोजेक्ट'! मुंबई-पुणे प्रवास फक्त अर्ध्या तासात

कुठून कुठपर्यंत जातो वॉकवे -

सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन मुंबईत हा ४८२ मीटरचा फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आला आहे. हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होणार असून तो डूंगरवाडी इथपर्यंत आहे. या एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेवरून जाताना मुंबईकरांना निसर्गरम्य ठिकाणावरून चालण्याचा अनुभव घेता येणार आहे.

Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुसाट; 100 KM चा महत्त्वाचा पल्ला पूर्ण

वॉकवेसाठी २५ कोटींचा खर्च -

हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे अतिशय सुंदररित्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे. हा वॉकवे साकारताना कमीत कमी सिमेंट काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. या वॉकवेवरून चालताना अरबी समुद्राचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यासाठी तब्बल २५ कोटी रूपयांचा खर्च आला आहे. या वॉकवेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण, रंगकाम, शौचालय आणि तिकीट काऊंटरचे काम पूर्ण केले जात आहे. हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे नवीन वर्षात म्हणजेच २०२५ च्या सुरूवातीलाच सुरू करण्याचा बीएमसीचा प्रयत्न आहे.

Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Fort In Mumbai: मुंबईतील 'हे' प्रसिद्ध किल्ले पाहिलेत का? 'वन डे ट्रीप'साठी बेस्ट ऑप्शन

एकही झाड तोडलं नाही -

अधिकाऱ्याने सांगितले की, मलबार हिल्स परिसरामध्ये हिरवीगार झाडी आहेत. यामधील अनेक झाडे ही खूपच जुनी आहेत. वॉकवे तयार करताना या झाडांचे संरक्षण करणं खूपच महत्वाचे होते. हा प्रकल्प तयार करण्यापूर्वी बीएमसीने एकही झाड तोडणार नसल्याचे सुनिश्चित केले होते. या परिसरामध्ये एकूण झाडं किती आहेत त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी बऱ्याच वेळा सर्वेक्षण करण्यात आले.

Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Navi Mumbai: एअरबॅगने घेतला मुलाचा जीव; एअरबॅग तोंडावर आपटल्यानं मुलाचा मृत्यू

आधी वॉकवेची लांबी होती जास्त -

झाडे वाचवण्यासाठी अनेकवेळा वॉकवेचे संरेखन बदलण्यात आले. आधी या वॉकवेची लांबी जास्त होती. पण पुन्हा संरेखित केल्यानंतर वॉकवेची लांबी ४८२ मीटरपर्यंत करण्यात आली. हा वॉकवे २.२ मीटर रुंद आहे. हा वॉकवे जवळपास १ किलो मीटरचा असेल. त्याची वहन क्षमता सुमारे ५०० किलो/चौरस मीटर इतकी आहे. ज्या खांबावर हा वॉकवे उभारण्यात आला आहे ते काँक्रीटऐवजी स्ट्रक्चरल स्टील वापरून बनवण्यात आले आहे.

Elevated Forest Walkway: मुंबईत तयार होतोय पहिला एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे, कसा आहे BMCचा ड्रीम प्रोजेक्ट; कधीपासून होणार सुरू?
Navi Mumbai Airport: एकाच वेळी ३५० विमाने उभी राहणार, ३.७ KM चा रनवे; सहा महिन्यात नवी मुंबईचं एअरपोर्ट सुरू होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com