Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुसाट; 100 KM चा महत्त्वाचा पल्ला पूर्ण

Bullet Train Mumbai-Ahmedabad: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील १०० किमीपेक्षा जास्त लांब मार्गिकेवर नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. यामुळे प्रवासादरम्यान आवाजाचा त्रास नाहीसा होणार आहे.
Bullet Train Work
Bullet Train WorkSaam Tv
Published On

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असताना बांधकामासंबंधित नवीन माहिती समोर आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ही कंपनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पाहत आहे. बुलेट ट्रेनच्या १०० किमीपेक्षा जास्त लांब मार्गिकेवर २०,००० पेक्षा अधिक नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत, अशी माहिती एनएचएसआरसीएल कंपनीने दिली आहे.

बुलेट ट्रेन आपल्या वायुवेगासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा ट्रेनचा वेग आणि वातावरणातील हवा यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. तेव्हा वाढत्या वेगामुळे प्रचंड आवाज होतो. या आवाजामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो. बुलेट ट्रेन चालताना प्रवाशांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ट्रेनच्या मार्गिकेवर नॉइज ब्लॉक्स बसवले जातात. बुलेट ट्रेनच्या मार्गिकेवरही असेच नॉइज ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत.

Bullet Train Work
Mumbai Pune Hyperloop: भारताचा पहिला 'हायपरलूप प्रोजेक्ट'! मुंबई-पुणे प्रवास फक्त अर्ध्या तासात

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर बसवण्यात आल्याची माहिती एनएचएसआरसीएल कंपनीने सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटच्या मार्गिकेवर तब्बल २०,००० पेक्षा जास्त नॉइज ब्लॉक्स उभारण्यात आले आहेत. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवाजामुळे त्रास होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्गिकेवर दर एका किलोमीटरने हे नॉइज ब्लॉक्स उभारण्यात आले आहेत. ट्रेन आणि ट्रॅक दरम्यान संघर्षामुळे होणारा दाब कमी करण्यासाठी ब्लॉक्समध्ये काँक्रीट पॅनल आहेत. हे पॅनल २ मीटर लांब तर १ मीटर रुंद आहेत. ८३०-८४० किलो इतके एका पॅनलचे वजन आहे. काही भागांमध्ये ३ मीटरचे पॅनल बांधले गेले आहेत. हे नॉइज ब्लॉक्स तयार करण्यासाठी सहा विविध ठिकाणी कारखाने सुरु करण्यात आले होते.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवरील २४३ किमी ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. ३५२ किमी ट्रॅकचे काम सुरु आहे आणि ३६२ किमी ट्रॅकच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. १३ नद्या, अनेक महामार्गांना जोडला जाणाऱ्या प्रकल्पातील पुलाचे कामही पू्र्ण झाले आहे. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होईल असा रेल्वे मंत्री अश्विनी वैश्वव यांना विश्वास आहे.

Bullet Train Work
Maharashtra Weather Update: थंडी गायब! राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com