Mumbai Bus Fire : मुंबईत दुरुस्ती करताना बसने अचानक घेतला पेट; क्षणार्धात उडाला आगीचा भडका, VIDEO

Mumbai Bus Fire update : मुंबईत दुरुस्ती करताना बसने अचानक पेट धरल्याची घटना घडली आहे. बसला आग लागल्यानंतर क्षणार्धात या आगीचा भडका उडाला. या आगीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Bus Fire
Bus Fire
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईत आगीचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत एका सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या ओशिवरा डेपोतील बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसला आग लागल्यानंतर क्षणार्धात आगीचा भडका उडाला. या बसला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा डेपोत असणाऱ्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. दुरुस्ती करत असताना सीएनजी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. बसने पेट घेतल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव झाली. या आगीचा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

Bus Fire
Mumbai Fire : कुर्ल्यातील हॉटेलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी, VIDEO

ओशिवरामध्ये आग लागलेली ही सीएनजी बस खासगी कंत्राटदार हंसा सिटी यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. या सीएनजी बस दुरुस्तीचं काम सुरु असताना अचानक आग लागली. या आगीमुळे बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डेपोतील अग्निविरोधक यंत्राच्या साहाय्याने बसला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

Bus Fire
America Wild Fire : ३०० कोटींचा बंगला जळून खाक, अमेरिकेत चाललंय तरी काय? पाहा थरकाप उडवणारा Video
Bus Fire
America Wild Fire : ३०० कोटींचा बंगला जळून खाक, अमेरिकेत चाललंय तरी काय? पाहा थरकाप उडवणारा Video

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसत आहे?

सीएनजी बसची दुरुस्ती सुरु होती. दुरुस्तीचं काम सुरु असताना अचानक बसने पेट धरला. बसला लागलेल्या आगीचा काही क्षणार्धात भडका उडाला. या आगीने काही वेळानंतर रौद्ररुप धारण केलं. या आगीने परिसरातील लोक घाबरून गेले. त्यांनी आगीवर नियत्रंण मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी बसजवळील कार मागे घेतली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. या आगीत बसचं मोठं नुकसान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com