Mumbai Fire : कुर्ल्यातील हॉटेलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी, VIDEO

Mumbai kurla Fire Update : मुंबईच्या कुर्ला येथील एका हॉटेलला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ५ हून अधिक घटनास्थळी पोहोचल्या. या भीषण आगीनंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली.
mumbai Fire
kurla fire Saam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही

Mumbai Kurla Fire : मुंबईतील कुर्ल्यात भीषण आगीची घटना घडली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत आग लागण्याचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या कुर्ला येथील रंगुन जायका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर हॉटेल परिसरात एकच धावाधाव झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

mumbai Fire
America Wild Fire : ३०० कोटींचा बंगला जळून खाक, अमेरिकेत चाललंय तरी काय? पाहा थरकाप उडवणारा Video

रंगुन जायका हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्परतेने दाखल झाले. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या दाखल झाल्या. आग लागल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी आजूबाजूचा परिसरात रिकामा केला.

mumbai Fire
Mumbai Firing: मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार, सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील घटना; व्यापारी गंभीर जखमी

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर त्यांनी पाण्याचा मारा मारत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ही आग नागरी वस्तीत जाऊ नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आगीनंतर कुल्यावरून विद्याविहारला जाणारा मार्ग आणि विद्याविहारहून कुर्ल्याला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

mumbai Fire
Mira Road firing : महाराष्ट्रात चाललंय काय? मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

मुंबई पोलीस आणि अग्निशन दलाचे घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. या हॉटेलमधील ग्राहकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. कुर्ल्यातील पश्चिम भागात असलेल्या हॉटेलला ही आग लागली. एलबीएस मार्गावर असलेल्या या हॉटेलचं आगीच मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com