Mumbai Dindoshi Fire : मुंबईच्या दिंडोशीत अग्नितांडव; ७० हून अधिक दुकाने जळून खाक, घटनास्थळी परिस्थिती काय?

Mumbai Dindoshi Fire update : मुंबईच्या दिंडोशीत अग्नितांडव पाहायला मिळत आहे. दिंडोशीत लागलेल्या आगीत ७० हून अधिक दुकाने जळून खाक झाले आहेत.
Mumbai Dindoshi Fire News
Dindoshi FireSaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या दिंडोशी भागात ७० हून अधिक दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकपाडा परिसरातील सुरुवातीला फर्निचरच्या पाच ते सहा दुकांनाना आग लागली. काही वेळानंतर ७० हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते.

मुंबईच्या दिंडोशी भागात फर्निचर दुकानांना ही आग लागली आहे. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ७० हून अधिक दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. ही आगीची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शनिवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही आगीची घटना घडली. आगीची तीव्रता वाढल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या बोलावण्यात आल्या आहेत.

Mumbai Dindoshi Fire News
Turkey Ski Resort Fire : रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! ६६ जणांचा होरपळून मृत्यू, ५१ जखमी

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी खडकपाडा परिसरात फर्निचर मार्केट आहे. या फर्निचर मार्केटला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत साधारणपणे 70 पेक्षा अधिक फर्निचर दुकाने जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे दुकानदारांचे कोट्यवधींची रुपयांचे नुकसान झालेले आहे. या भीषण आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले आहे.

Mumbai Dindoshi Fire News
Vasai Firing : राज्यात पुन्हा गोळीबाराचा थरार! वसईत दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, नागरिक दहशतीत

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या ठिकाणी दुकानदार हळूहळू व्यक्त होताना दिसत आहेत.

स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग

धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ही आग लागली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धाराशिव विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतंही नुकसान आणि जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप पोहोचलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com