
संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी
Mumbai Water Cut News Update in Marathi : मुंबईकरांवर आज पाणीबाणीचे संकट ओढावलेय. शुक्रवारी मलाड पश्चिम परिसरात जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम येथे राहणाऱ्या नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावे लागत आहे. दरम्यान, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम वेगात सुरू आहे. आज हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून पाणी सुरूळीत होईल, असे सांगण्यात येत आहे.
मालाड पश्चिम परिसरातील लिबर्टी जलबोगदा येथे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याचे पालिकेला निदर्शनास आले आहे. या जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री १०.३० वाजता हाती घेण्यात आले आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार बंद राहील.
कोण कोणत्या विभागात आज पाणी नाही -
मालाड पश्चिमेकडील अंबुजवाडी, आजमी नगर, जनकल्याण नगर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बीएमसीने या भागातील रहिवाशांना योग्यरित्या पाण्याचा वापर करण्यासाठी आणि दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. कॉर्पोरेशनच्या टाइमलाइननुसार शनिवारी सकाळपर्यंत सामान्य पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.