Mumbai Dagadi Chawl Fire : मुंबईतील दगडी चाळीतील इमारतीला आग, १ तासानंतर...

Mumbai Fire broke out at Dagadi Chawl : मुंबईतील भायखळा परिसरात दगडी चाळीतील इमारतीत आग लागली.
Mumbai Dagadi Chawl Fire
Mumbai Dagadi Chawl FireSAAM TV
Published On: 

रुपाली बडवे

Mumbai Dagadi Chawl Fire Breaking News : मुंबईतील भायखळा परिसरातील दगडी चाळीत एका इमारतीला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीला ही आग लागल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) भायखळा परिसरात बी. जे. मार्गावरील दगडी चाळीतील दोन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आग (Mumbai Fire) लागली.

Mumbai Dagadi Chawl Fire
Navi Mumbai Fire : नवी मुंबईत अग्नितांडव; पेपर कंपनीला भीषण आग, ८ अग्निबंब घटनास्थळी

बुधवारी रात्री साधारण ९ वाजून २० मिनिटांनी ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या (BMC) अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी पोहोचले.

दगडी चाळीतील इमारतीला आग लागल्याच्या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन केंद्राला (Mumbai Fire Brigade) कळवण्यात आली. अग्निशमन केंद्राचे जवान, वाहतूक पोलीस, पोलीस (Police) आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

एका तासानंतर आग आटोक्यात

जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल एका तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले.

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आगीच्या घटनेची माहिती मिळताच चार अग्निशमन बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहोचले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mumbai Dagadi Chawl Fire
Gujarat News: अहमदाबादमधील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग; एका चिमुकलीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.